आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अग्नी-१’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालासोर - भारताने सोमवारी अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नी-१ बॅलिस्टिक या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. चाचणीच्या वेळी क्षेपणास्त्राने ७०० किलोमीटरचे अंतर ९.३६ मिनिटांत पूर्ण केले.

लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवेतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र घनरूप प्रोपेलेंटवर चालते. सकाळी ९.२५ वाजता अब्दुल कलाम आयलँडवरून सोडण्यात आले. १२ टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची लांबी १५ मीटर आहे. एक टन वजन वाहून नेण्यास ते सक्षम आहे. वजन कमी करून त्याची भेदक क्षमता वाढवता येऊ शकते. अग्नी-१ याआधीच लष्करात समाविष्ट करण्यात आले आहे. चाचणी भारतीय लष्कराच्या सामरिक बल कमांडच्या वेळोवेळी होणाऱ्या अभ्यासाचा भाग होती. अग्नि १ डिआरडीओची एक संस्था अॅडव्हान्सड सिस्टिम्स लॅबोरॅटरीने संशोधन विकास प्रयोगशाळेत व संशोधन केंद्र इमारतीच्या सहकार्याने विकसित केले. त्याला हैदराबादच्या भारत डायनामिक्स लिमिटेडने मदत केली.
बातम्या आणखी आहेत...