आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नी -4 या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशा- अग्नी-4 या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडिशा किनारपट्टीच्या व्हीलर बेटावरून सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. 4 हजार किमीपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रामध्ये एक टनाचे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. डीआरडीओने विकसित केलेले पृथ्वी- 4 क्षेपणास्त्र लवकरच भारतीय लष्करामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

अग्नी-4 क्षेपणास्त्राची ही तिसरी यशस्वी चाचणी आहे. या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी नोव्हेंबर 2011 मध्ये तर दुसरी चाचणी सप्टेंबर 2012 मध्ये घेण्यात आली होती.