आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agonised Students Attack On Shaktipunj Express At Jharkhand Plamu

झारखंड: विद्यार्थ्यांचा शक्तिपुंज एक्स्प्रेसवर हल्ला, थोडक्यात बचावला चालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/पलामू- झारखंडमधील पलामू जिल्ह्यात डाल्टनगंज रेल्वे स्टेशनवर हजारों विद्यार्थ्यांनी शनिवारी शक्तिपुंज एक्स्प्रेसवर हल्ला केला. संतप्त विद्यार्थ्यांनी एक्स्प्रेसवर तूफान दगडफेक केली. एक्स्प्रेस इंजिन व कोचची तोडफोडही केली. इंजिन चालक व प्रवाशी थोडक्यात बचावले. चालक व प्रवाशांनी घटनास्थळावरून पळ काढला तर काही प्रवाशांनी कोचमध्ये स्वत:ला बंद करुन घेतले.

कुठे जात होते विद्यार्थी?
- सर्व विद्यार्थी रविवारी पोलिस भरतीसाठी धनबाद येथे निघाले होते.
- शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी इंजिनवर चढले. चालकाने त्यांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थी भडकले.
- संतप्त विद्यार्थ्यांनी इंजिनासह अनेक कोचच्या खिडक्यांचे कात तोडले.

तब्बल चार तास उभी होती एक्स्प्रेस...
- डाल्टनगंज स्टेशनवर तब्बल चार तास शक्तिपुंज एक्स्प्रेस उभी होती. सर्व प्रवाशी तात्कळत बसले होते.
- एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याचे चालकाने सांगितले.

तीन प्रवाशांची प्रकृती बिघडली...
- विद्यार्थ्यांच्या गोंधळात तीन महिलांची प्रकृती अचानक बिघडली.
- गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून आल्यानंतर रॅपिड अॅक्शन फोर्सला पाचारण करण्‍यात आले. पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली.

कुठे जात होती एक्स्प्रेस ट्रेन?
- शक्तिपुंज एक्स्प्रेस जबलपूरहून हावडा येथे जात होती. या दरम्यान डाल्टनगंज स्टेशनवर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. धनबाद जाणार्‍या विद्यार्थ्यांची डाल्टनगंजमध्ये प्रचंड गर्दी होती.
- विद्यार्थी धनबाद येथे पोलिस भरतीच्या परीक्षेला निघाले होते. मात्र, एक्स्प्रेस तब्बल चार तास थांबल्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. संतप्त विद्यार्थ्यांनी एक्स्प्रेसवर दगडफेक केली.

पुढील स्लाइडवर पाहा, संतप्त विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व फोटो...
(फोटो /व्हिडिओ : सोहन सिंह)