आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agra Day After Homecoming Muslim Families Deny Embracing Hinduism

15 हजार मुस्लिमांना हिंदू करण्याची घोषणा, मायावती म्हणाल्या - धार्मीक तणाव वाढेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - आग्र्यातील मुस्लिमांच्या धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय रंग आला आहे. राज्यसभेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आमिष देऊन लोकांना फसवले गेल्याचा आरोप केला. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवदेन करण्याची मागणी करत सरकारने यात दखल देण्याची गरज व्यक्त केली.
मायावती म्हणाल्या, 'आग्र्यातील धर्म परिवर्तनाचा मुद्दा गंभीर आहे. अशीही माहिती आहे, की यानंतर अलिगडमध्ये असाच कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय असल्याने समाजवादी पक्षाच्या सरकारने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. या सगळ्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस आणि बजरंग दल आहे. या सर्व प्रकरणातून जातीय द्वेष पसरवण्याच प्रयत्न होत आहे. उत्तर प्रदेशसह देशभरात ही आग पसरेल.'
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धर्म परिवर्तन प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मुस्लिमांना हिंदू धर्मात आणल्याच्या दुसर्‍याच दिवशी दोन व्यक्तींनी बजरंग दलाच्या लोकांवर बळजबरीने धर्म परिवर्तन करवून घेतल्याचा आरोप केला आहे. बुधवारी संसदेतही याप्रकरणाचे पडसाद उमटले. यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लावून धरली. तर, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत धर्म जागरण मंचाचे उत्तर प्रदेश प्रमुखाने 25 डिसेंबर रोजी 15 हजार लोकांचे धर्म परिवर्तन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
काय आहे प्रकरण
सोमवारी मुस्लिम कुटुंबातील 387 सदस्यांचे धर्मांतर करुन त्यांना हिंदू धर्मात आणले गेले होते. या लोकांनी हिंदू धर्म स्विकारल्यानंतर कालीमातेची पुजा आणि आरती केली होती. मात्र, मंगळवारी याच लोकांनी नमाज पठण केले आणि आम्ही मुस्लिम असल्याचे सांगितले. त्यांनी आरोप केला आहे, की धर्म जागरण मंच आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दारिद्रय रेषेचे कार्ड आणि प्लॉट देण्याचे आमिष दाखवले आणि फोटो काढून घेतले होते. आमचे धर्म परिवर्तन केले जात असल्याचे आम्हाला माहित नव्हते, असेही ते म्हणाले आहेत.मात्र, या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार्‍या इस्माइलने सोमवारी त्याचे नाव राजकुमार असल्याचे सांगितले होते आणि त्याने प्रसाद देखील वाटला होता.
बजरंग दलाने म्हटले होते - घर वापसी
धर्म जागरण मंचाचे म्हणणे आहे, की सर्व मुस्लिमांना त्यांच्या इच्छेने हिंदू धर्मात आणले गेले होते. सोमवारी देवरी रोड येथील वेदनगरमध्ये राष्टीय स्वयंसेवक संघाच्या धर्म जागरण मंच आणि बजरंग दलाने धर्मांतर कार्यकर्माचे आयोजन केले होते. यात वेदनगरमधील जवळपास 60 मुस्लिम कुटुंबातील 387 सदस्यांना यज्ञ करुन हिंदू धर्मात आणले गेले होते. तेव्हा धर्म जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगितले होते, की यांचे पूर्वज कधीकाळी हिंदूच होते. आता त्यांना परत हिंदू केले गेले आहे. ही 'घर वापसी' आहे.
मंगळवारी वृत्तपत्रांमध्ये याची बातमी आल्यानंतर मुस्लिमांनी याला धोकेबाजी म्हटले आहे. त्यांनी कालीमातेची मूर्ती तिथेच राहाणार्‍या एका व्यक्तीच्या घरी ठेवली आणि नमाज अदा केली. त्यांनी म्हटले, आम्हाला सांगितले गेले होते की एका मोठ्या नेत्यासोमर फक्त फोटो घ्यायचे आहेत. तुम्हाला दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि प्लॉट दिला जाईल. धर्म परिवर्तनासंबंधी आम्हाला काहीही सांगितले नव्हते.
15 दिवसांपासून सुरु होते प्रयत्न
इस्माइलची पत्नी मोनिरा बेगम यांनी सांगितले, की धर्म जागरण मंचाचे नंदकिशोर पंधरा दिवसांपासून धर्म परिवर्तनाचे प्रयत्न करीत होते. मुस्लिम बहुल भागात मंदिर उभारण्याच्या बदल्यात येथील नागरिकांना दारिद्र्य रेषेचे कार्ड दिले जाईल असे त्यांनी सांगितले होते.

फोटो -ब्राह्मणांच्या हस्ते सगळ्यांकडून हवन व मंत्रोच्चार करवून घेण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, या घटनेसंबंधीची आणखी छायाचित्रे