आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • AGRA Up Shocker Videos Of Two Different Gang Rapes Posted On Internet News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP मध्ये 48 तासांत \'गॅंगरेप\'च्या दोन घटना, \'इंटरनेट\'वर पोस्ट केले VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- उत्तरप्रदेशात गेल्या 48 तासांत सामुहीक बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहे. पहिली घटना संभल जिल्ह्यातील आहे. नराधमांनी एका महाविद्यालयीन तरुणीवर सामुहीक बलात्कार करून तिचा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला आहे.

दुसर्‍या घटनेत तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार केला आहे. तसेच तिचा व्हिडिओ बनवून 'यू-ट्यूब' आणि 'वॉट्सअॅप'वर पोस्ट केला आहे.
पीडित तरुणीने सांगितली आपबिती...
आग्रा येथील सामुहीक बलात्काराची घटना 15 जानेवारीला घडली होती. मात्र, नराधमांनी तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने चुप्पी साधली होती. पीडित तरुणी आग्रा येथील एत्‍माउद्दौलामधील रहिवासी आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शेजारी राहाणार्‍या एका व्यक्तीने व्हिडिओबाबत पीडितेच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीने मौन तोडल्याचे, पोलिसांनी सांगितले. पीडितेने सांगितले की, त‍िचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा पीडिता घरात एकटीच होती. हे पाहुन काही लोक घरात घुसले. पिस्तुलाचा धाक दाखून सगळ्यांनी तिच्यावर आळीपाळीने सामुहीक बलात्कार केला. एवढेच नव्हे तर व्हिडिओ शूट करून आरोपींनी व्हिडिओ 'वॉट्सअॅप' आणि 'यू-ट्यूब'वर शेअर केले. सर्व आरोपी पीडितेच्या गावातील आहेत.

यादरम्यान, पोलिसांनी 15 वर्षीय मुलीवर सामुहीक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ‍तिघांना अटक केले आहे. नरेश, जयवीर आणि राजेश अशी आरोपींचे नावे आहेत. तिघांना मुलीच्या बलात्काराचा व्हिडिओ काळ्या बाजारात विकला. पोलिस व्हिडिओ क्‍लीपिंग खरेदी करणार्‍या आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याचे एत्‍माउद्दौलाचे इन्स्पेक्टर शैलेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून वाचा, मुंबईत तरुणीवर तिघांनी केला सामुहीक बलात्कार...