आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रसेन रथयात्रेत ६ राज्यांतील भाविकांची समृद्धीची पताका, दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवालही सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाटूश्यामजी / जीणमाता- मध्य प्रदेशसह सहा राज्यांतील अग्रवाल बंधू राजस्थानातील शेखावाटीतील पाच प्रमुख धर्मस्थळांच्या यात्रेसाठी शनिवारी खाटूश्यामजी शहरात दाखल झाले. १२०० हून अधिक भाविकांची मांदियाळी अग्रसेन रथयात्रेत पाहायला मिळत आहे. यात्रेचे आयोजन अग्रवाल समाजाच्या केंद्रीय समिती इंदूरने केले आहे. यात्रेचे नेतृत्व दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल करत आहेत. 
 
यात्रेत सहभागी अग्रवाल समाजाच्या भाविकांनी खाटूच्या वृंदावनच्या धर्मशाळेत बाबाश्याम यांची पूजाअर्चना केली.  या वेळी या मार्गावर यात्रेत सहभागी भाविकांचे ठिकठिकाणी साग्रसंगीत स्वागत करण्यात आले. बाबाश्याम यांच्या दरबारामध्ये भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी सुख-समृद्धीची प्रार्थना केली. या निमित्ताने श्री श्याम मंदिर कमिटीचे मंत्री प्रताप सिंह यांनी उपरणे देऊन त्यांचे स्वागत केले. स्मृतिचिन्ह भेट दिले. या प्रसंगी अग्रवाल समाजाचे संजय भाकडा, अरविंद्र बागडी, विष्णू बिंदल, राजेश बंसल, अशोक मित्तल,  विनोद अग्रवाल, आेमप्रकाश चायवाला, किशोर गोयल, खाटूश्यामजीचे अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोद हलवाई, आेमप्रकाश हरनाथका, सीताराम हरनाथका, कैलाशचंद्र शर्मा, गिरीराज विश्वकर्मा, अशाेक पटवारी, सुंदरलाल यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, भाविकांनी शनिवारी दुपारी जीणमाता मंदिरात जाऊन मातेची आेटी भरली. त्यानिमित्ताने ३५० फुटांची चुनरी अर्पण करण्यात आली. सायंकाळी यात्रा सालासरला दाखल झाली. रविवारी सकाळी राणी सती मंदिरात महाआरती कार्यक्रम होणार आहे. 

यात्रेच्या चार गोष्टी  
- यात्रेत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश,  गुजरातमधील भाविक सहभागी झाले आहेत.  
- खाटूश्यामजी, जीणमाता, सालासर बालाजी, झुंझुनूंच्या राणी सती मंदिर तथा शाकंभरी देवीचे दर्शन घेणार.  
- गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने यात्रेला विक्रमासाठी नामांकन दिले आहे.  
- १२०० भाविक शेखावाटीतील पाच धामसाठी दाखल झाले. त्या रेल्वे गाडीला ‘अग्रसेन रथ’ असे नाव देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...