आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छत्तीसगड : गृहमंत्री पोहोचण्याआधी सापडले दोन टिफीन बॉम्ब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह छत्तीसगडमध्ये पोहोचण्या आधीच नक्षलवादी सक्रीय झाले. गृहमंत्री आज छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. दरम्यान सुकमा जिल्ह्यातील दोम्पाल येथे दोन टिफीन बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी शुक्रवारी सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धर्मपेंटा गावात भू-सुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात एक जवान शहीद झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच छत्तीसगड दौऱ्यावर आले होते. तेव्हा नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील पाच गावातील शेकडो नागरिकांना ओलीस ठेवले होते.
राजनाथसिंह शनिवारी दुपारी रायपूरला पोहोचतील. नवीन रायपूर येथील पोलिस मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन केल्यानंतर त्यांची राज्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. रविवारी सकाळी ते जगदलपूर येथे जातील. त्यानंतर आज जिथे टिफीन बॉम्ब सापडले त्या सुकमा जिल्ह्यतील पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उदघाटन करणार आहेत.
मोदींच्या दौऱ्याआधी 500 गावकरी ठेवले होते ओलिस
पंतप्रधान मोदी 9 मे रोजी छत्तीसगड दौऱ्यावर होते. त्यांनी दंतेवाडा येथील एक सभेला संबोधित केले होते. मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी नक्षलवाद्यांनी 500 गावकऱ्यांना ओलिस ठेवले होते. हे सर्व गावकरी मोदींच्या सभेला जाणार असल्यामुळे नक्षलवाद्यांनी त्यांना बंदिस्त केले होते. मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले. मोदींच्या दौऱ्या दरम्यान नक्षलवाद्यांनी दंतेवाडा आणि बस्तर बंदचे आवाहन केले होते.