आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ahead Of The Passenger Train Was Cheaper Than Plane Travel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवासी घटल्याने रेल्वेपेक्षा स्वस्त झाला विमान प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - रेल्वे आणि हवाई प्रवास करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात प्रवास करणारे लोक आता या वातानुकूलित रेल्वे प्रवासाएवढ्याच दरात हवाई प्रवास करू शकताहेत. मंद, ऑफ पर्यटन हंगाम असल्याने प्रवासी संख्या घटल्याच्या कारणामुळे विमान कंपन्यांनी हवाई प्रवासाचे भाडे आता एसी रेल्वे डब्याच्या भाड्याएवढे कमी केले आहे.

परिस्थिती अशी आहे की, दिल्ली, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबादचे हवाई प्रवासाचे भाडे रेल्वेच्या प्रथमश्रेणी एसी दराएवढेच झाले आहे. हे भाडे कमी करण्यामागे प्रवासी संख्या वाढवल्याचे एकमेव कारण असल्याचे मानले जात आहे. हिवाळा म्हणजेच पर्यटन हंगामात असणार्‍या विमान प्रवास भाड्याच्या अर्धेच दर सध्याच्या विमान प्रवासाचे झाले आहेत. वर्तमानात ३६६१ रुपयांत बंगळुरू आणि १६६५ रुपयांत तुम्ही जयपूरहून दिल्लीचा विमान प्रवास करू शकता. हे विमान प्रवास भाडे केवळ बंगळुरू, दिल्ली विमान प्रवासाचेच फक्त कमी झाले असे नव्हे, तर जयपूरहून जाणार्‍या सर्वच विमान उड्डाणांचे प्रवास भाडे कमी झाले आहे. या प्रवास भाड्यात पर्यटन हंगाम सुरू झाल्यावर पुन्हा वाढ होऊ शकते. आता मात्र आपण स्वस्त विमान प्रवासाचा आनंद घेऊ शकता. पर्यटन हंगामाची सुरुवात नवरात्रीच्या जवळपासचे दिवस आहेत असे मानले जाते. हिवाळी हंगामात कमीत कमी हवाई प्रवास भाडे हे २८०० ते ३००० रुपयांपर्यंत राहू शकते. जेव्हा की ते आता हे भाडे घटून १६६५ रुपये झाले आहे.

हे दर राहू शकतात १० ऑक्टोबरपर्यंत स्थिर
हवाई प्रवास भाडे दीपावली आणि हिवाळ्यात सर्वाधिक असतात. याचे कारण हे आहे की, या वेळी पर्यटन हंगामाची सुरुवात होते. अस मानले जाते की, राजस्थान वा सर्वत्र थोड्या अधिक फरकाने डिसंंेबर, जानेवारी आणि फेब्रुवारीत पर्यटकांची आवक सर्वात अधिक असते. अशा वेळी मग भाडे वाढले जाते. ट्रॅव्हल एक्स्पर्टच्या मतानुसार आता या क्षणी एअर इंडियासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीचे विमान प्रवासाचे भाडे अपेक्षेप्रमाणे कमी आहे. अशात मग ज्यांना हवाई प्रवास करायचा आहे त्यांना या कमी दरातील हवाई प्रवासाचा आनंद घेण्याची ही सुवर्णसंधी आहे आणि याचा लाभ तुम्ही उठवू शकता.