आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP सरकार आणणार \'समाजवादी स्मार्टफोन\'; अखिलेश म्हणाले, आम्ही स्मार्ट काम करतोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘समाजवादी स्मार्टफोन योजना’ची घोषणा केली आहे. 6 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना सरकार नवाकोरा करकरीत स्मार्टफोन मिळणार आहे. आम्ही स्मार्ट काम करतोय, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही घोषणा केल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले अखिलेश यादव...
- अखिलेश यादव यांनी सांगितले की, समाजवादी सरकारकडे नवी दृष्टी आहे. सरकार नेहमी जनतेच्या हिताचे निर्णय घेते. स्मार्ट काम करते. राज्यातील जनतेसाठी नव्या योजना आणते. पण, ही गोष्ट विरोधकांच्या जिव्हारी लागते. विरोधक सरकारवर टीका करत असते. सरकारच्या लॅपटॉप योजनेने राज्यात परिवर्तन दिसून आले आहे. गावातील मुलांमधील लॅपटॉपची भीती नाहिशी झाली आहे.
- गावातील मुले आता लॅपटॉप हाताळताना दिसत आहेत. त्यांना स्वत:चा प्रोफाइल बनवता येतो. एका फोनवर अॅम्बुलन्स गावात येते, 100 डायल केल्यास पोलिस तुमच्या मदतीला हजर होतात, ही अत्यावश्यक सेवा समाजवादी पक्षाने सुरु केली आहे.

90 टक्के जनतेला मिळाला लाभ...
अखिलेश यादव यांनी सांगितले की, समाजवादी सरकारने आतापर्यंत घोषणा केल्याला योजनाचा 90 टक्के जनतेने लाभ घेतला आहे. सध्या काही योजनांवर कार्यवाही झाली आहे, तर भविष्यात काही जनतेच्या हिताच्या योजना येणार आहेत.
- तत्कालीन सरकारच्या काळात तर वाढदिवसाच्या नावाखाली जनतेकडून वसुली केली जात होती, अखिलेश यांनी मायावती यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता बसप सरकारवर खोचक टीका केली.

'समाजवादी स्‍मार्टफोन'साठी असा करावा अर्ज...
- ही योजना केवळ उत्तर प्रदेशातील जनतेसाठी आहे.
- योजनेसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तिचे वय 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्जदाराला फोन लगेच मिळणार नाही. सध्या या योजनेची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. अर्जदाराने www.samajwadisp.in वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना 10 वीचे गुणपत्रकाची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेले. योजनेसाठी 'प्रथम नाद प्रथम संधी', हा निकष लावण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, UP सरकारने केला होता 15 लाख लॅपटॉप-टॅबलेट देण्याचा दावा...
बातम्या आणखी आहेत...