आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahul Gandhi Meets Muzaffarnagar Riot Victims At Relief Camps, Urges Them To Return Home

दंगलग्रस्तांनो, घरी परत फिरा; मुजफ्फरनगर दंगलग्रस्तांच्या छावणीस राहुल गांधींची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर (श्यामली) - मुजफ्फरनगर दंगलग्रस्त नागरिक सध्या मदत छावणीत राहतात; परंतु त्यांनी आता आपल्या घरी परत गेले पाहिजे. कारण त्यांनी अशा परिस्थितीत राहावे, हीच दंगल घडवून आणणार्‍या प्रवृत्तीची इच्छा आहे. दंगल घडवून आणणारे अशा परिस्थितीचा ‘फायदा’ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल यांचा दौरा रविवारी सकाळीच सुरू झाला. मुजफ्फरनगरमधील दंगलग्रस्तांच्या छावणीला त्यांनी भेट दिली. उत्तर प्रदेशातील मलकापूर भागात त्यांनी भेट दिली. ज्यांनी जातीय दंगल घडवून आणली त्यांना दंगलग्रस्त नागरिक असेच छावणीत राहावेत, असे वाटते. ही बाब त्यांना फायद्याची ठरते. विशिष्ट नागरिकांना गावापासून दूर ठेवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न आहे. मला ठाऊक आहे की, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही; परंतु आपण त्यावर निश्चितपणे पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. संदेश स्पष्ट आहे. तुम्ही तुमच्या गावी परतू नये. त्यासाठीच अशी कृती केली जाते, हे लक्षात घ्या. राहुल यांनी दंगलग्रस्तांशी संवाद साधला. काँग्रेसने खुरगाव छावणीतील नागरिकांसाठी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन केले होते. तेथेच राहुल यांनी दंगलग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या दंगलीत 62 जणांचा मृत्यू झाला होता. थंडीमुळे एका मदत छावणीतील मुलाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी केलेल्या या दौर्‍याला महत्त्व आले होते.

पुढील स्लाइडमध्ये, घरी परत जाण्याची इच्छा नाही