आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIADMK चा दावा: जयललितांच्या निधनाने अनेक दुःखी, आजारपण, धक्क्याने 77 मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - AIADMKने दावा केला आहे की, जयललितांचे आजारपण आणि नंतर निधनाची बातमी आल्यानंतर दुःखामुळे आणि धक्क्यामुळे 77 जणांचा मृत्यू झाला. अम्माच्या मृत्यूनंतर मीडियाने 3 जण धक्क्याने दगावल्याचे आणि दोघांनी आत्महत्या केल्याचे वृत्त दिले होते. मात्र त्यावेळी याला कोणीही दुजोरा दिला नव्हता. पक्षाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 3 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा दावा केला आहे. मृतांमध्ये महिला आणि पुरुष किती होते हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच हे लोक कुठले राहणारे आहेत, हेही स्पष्ट नाही. सोमवारी रात्री उशीरा 11:30 वाजता जयललिता यांचा मृत्यू झाला होता.

अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांची गर्दी..
- जयललिता 75 दिवस चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या, त्या दरम्यान त्यांचे समर्थक 24-24 तास हॉस्पिटलच्या बाहेर उभे राहत होते.
- यापूर्वी जयललितांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगात जावे लागले तेव्हाही दुःखी झालेल्या समर्थकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते.

# MGR च्या निधनानंतर हिंसाचारात 29 ठार
- मुरुथूर गोपालन रामचंद्रन (MGR) यांनी डीएमकेमधून बाहेर पडत 1972 मध्ये एआयएडीएमके पक्ष स्थापन केला. त्यानंतर 5 वर्षांनी ते मुख्यमंत्रीही बनले.
- फॉलोअर्स MGR ला देव मानायचे. MGR च्या निधनाच्या वेळी संपूर्ण तामिळनाडूमध्ये दंगली सुरू झाल्या होत्या.
- त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार संतप्त जमावांनी दुकाने, सिनेमागृह, पब्लिक आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीला लक्ष्य केले होते.
- MGR ची अंत्ययात्रा आतापर्यंतची सर्वात हिंसक अंत्ययात्रा होती असे मानले जाते.
- या अंत्ययात्रेत 10 लाख लोक सहभागी झाले होते. त्यांना आवरणे पोलिसांना कसेही शक्य होत नव्हते.
- त्यादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे 29 जणांनी प्राण गमावले होते आणि 47 पोलिस गंभीर जखमी होते.
- एमजीआर जयललितांचे मेंटर होते. तेच अम्मांना राजकारणात घेऊन आले होते.
- रिपोर्ट्सनुसार MGR यांच्या मृत्यूनंतर 30 जणांना आत्महत्याही केली होती.

# 1987 ची पुनरावृत्ती नको म्हणून केंद्र सरकार होते अलर्ट
- सलग दुसऱ्यांदा 2016 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर MGR आणि जयललिता यांच्या लोकप्रियतेती तुलना केली जाऊ लागली होती.
- बेंगळुरू कोर्टाने जेव्हा त्यांना दोषी ठरवले तेव्हा याची प्रचिती आली होती.
- यादरम्यान, AIADMK चे कार्यकर्ते रागाच्या भरात सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करू लागले होते.
- त्यानंतरच जयललितांचे आरोग्य ढासाळले होते. केंद्राने संपूर्ण प्रकरणावर नजर ठेवलेली होती.
- गृहमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष्य ठेवून होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जयललितांच्या मृत्यूनंतर जनतेने केलेला आक्रोश...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...