आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय गुरुंचे 24 ला निधन, तर अम्मांवर 6 ला अंत्यसंस्कार, वाचा तारखांचा खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयललिता यांना राजकारणात आणणारे करिश्माई नेते एमजीआर यांचे निधन डिसेंबर 1987 मध्ये झाले होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने जयांना त्यांच्या पार्थिवाशेजारी उभे राहाण्यास मनाई केली होती. - Divya Marathi
जयललिता यांना राजकारणात आणणारे करिश्माई नेते एमजीआर यांचे निधन डिसेंबर 1987 मध्ये झाले होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने जयांना त्यांच्या पार्थिवाशेजारी उभे राहाण्यास मनाई केली होती.
चेन्नई- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके प्रमुख जयललिता यांचे निधन काल झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे राजकीय गुरु एमजी रामचंद्रन यांचे निधन 24 डिसेंबरला झाले होते. यातील दोन्ही आकड्यांची बेरीज केली तर संख्या 6 येते. विशेष म्हणजे याच दिवशी म्हणजेच 6 डिसेंबरला जयललिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डिसेंबर तामिळनाडूसाठी बहुतेकवेळा अशुभ राहिललेला आहे. जयललिता यांच्या निधनाने या महिन्याने पुन्हा एकदा तामिळनाडूच्या जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अखेराच श्वास घेणाऱ्या प्रसिद्ध नेत्यांच्या पंक्तित आता जयललिता यांचेही नाव येत राहिल. त्यांचे राजकीय गुरु एमजी रामचंद्रन यांचे निधनही याच महिन्यात झाले होते. सुनामी देखिल याच महिन्यात आली होती, ज्यामध्ये 7000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

- एआयएडीएमकेचे संस्थापक आणि अभिनेते एमजीआर यांचे निधन 24 डिसेंबर 1987 रोजी झाले होते.
- एमजीआर यांच्या उत्तराधिकारी जयललिता यांचे निधनही याच महिन्यात झाले आहे.
- दोन्ही नेत्यांचा प्रदिर्घ आजारानंतर मृत्यू झाला आहे.

आणखी कोणत्या नेत्यांचे झाले या महिन्यात निधन
- दिग्गज नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे निधन 25 डिसेंबर 1972 रोजी झाले होते.
- पुरोगामी विचारवंत आणि नेते 'पेरियार', ई.व्ही. रामास्वामी यांचे निधन 24 डिसेंबर 1972 रोजी झाले होते.
- या दोन्ही नेत्यांचे वय 94 वर्षे होते.
निसर्गाची अवकृपाही याच महिन्यात
- वर्षाचा अखेरचा महिना डिसेंबर, तामिळनाडूवर नेहमीच काहीना काही संकट घेऊन येत असल्याचे जयांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा दिसून आले आहे.
- राज्यात 26 डिसेंबर 2004 मध्ये सुनामी आली होती. त्यात जवळपास 7000 लोक मृत्यूमुखी पडले होते आणि मोठी वित्तहानी झाली होती.
- डिसेंबर 2005 मध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे चेन्नई, कांचीपुरम, कडलोर, तिरुवल्लोर आणि थूथूकुडी येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...