आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांकडे होती 114 कोटींची प्रॉपर्टी, आता हे असू शकतात त्यांच्या संपत्तीचे वारसदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जयललिता यांच्या निधनानंतर त्याच्या राजकीय वारसाबाबत विविध चर्चा आहेत. पण त्याचबरोबर त्याच्या 114 कोटींच्या संपत्तीचा वारसा हक्क कोणाला मिळणार हाही एक मोठा प्रश्न आहे. जयललिता 6 वेळा मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यांच्या लाईफस्टाइलवरूनही अनेकदा वाद निर्माण झाले होते. त्यांच्याकडे 10 हजाराहून अधिक साड्या आणि सुमारे 750 चपला होत्या असे सांगितले जायचे. एप्रिल 2015 मध्ये त्यांनी स्वतःच 114 कोटींच्या संपत्तीची घोषणा केली होती. जयललितांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार केले होते किंवा नाही, याबाबत मात्र अद्याप काहीही समोर आलेले नाही.

कोण बनू शकते वारसदार..
1. शशिकला
- एमजी रामचंद्रन (एमजीआर) च्या अत्यंत नीकटवर्तीय राहिलेल्या व्हीएस चंद्रलेखा यांचे पीआरओ एम नटराजन यांची पत्नी शशिकला 80 च्या दशकात जयललितांच्या संपर्कात आली. त्यानंतर ती त्यांची सर्वात जवळची व्यक्ती बनली.
- अगदी यापूर्वी जयललिता दोन वेळा जेव्हा न्यायालयीन प्रकरणात अडकल्या होत्या त्यावेळीही पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी शशिकला यांची मंजुरी घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात आला होता.
- त्यामुळे जयललितांची संपत्ती शशिकला सांभाळू शकतात.

2. व्ही एन सुधाकरन
- शशिकलाच्या प्रभावामुळे जयललिताने व्हीएन सुधाकरनला दत्तक पुत्र बनवले होते. सध्या तेच जया टिव्ही सांभाळतात.
- 1995 मध्ये व्हीएन सुधाकरन यांचे लग्न हा संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनला होता. त्यावर जवळपास 100 कोटी रुपये खर्च झाले होते.
- त्यामुळेच 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकांत जयललितांच्या पक्षाचा सर्व 39 जागांवर पराभव झाला होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा.. जयललिता यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्तेेविषयी...
बातम्या आणखी आहेत...