आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांच्या पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एक होणार, दिनाकरन-शशिकला यांना बाहेरचा रस्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूमधील राजकारणात मोठा फेरबदल होणार आहे. माजी सीएम दिवंगत जयललिता यांचा पक्ष AIADMKचे दोन्ही गट पुन्हा एक होत आहेत. एक गट जयललितांच्या जवळच्या शशिकला यांचा आहे. सीएम पलानीस्वामी याच गटाचे आहेत, तर दुसरा गट ओ. पन्नीरसेल्व्हम यांचा आहे. वृत्तसंस्थेने AIADMK सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की पन्नीरसेल्व्हम गटाचे दोन्ही मंत्री सरकारमध्ये सामील होऊ शकतात. दुसरीकडे, शशिकला आणि जया यांचे भाचे दिनाकरण यांनाही पक्षातून बाहेर करण्यात येणार आहे. 
 शशिकला सध्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. 
 
 पलानीस्वामी यांची दिनाकरनवर कडक भूमिका...
 - 5 डिसेंबर 2016 रोजी आजारपणानंतर जयललिता यांचा मृत्यू झाला. यानंतर AIADMK चे दोन गटांत विभाजन झाले. शशिकला यांनी ओ. पन्नीरसेल्व्हम यांना हटवून पलानीस्वामी यांना सीएम बनवले होते.
 - शशिकला तुरुंगात गेल्यानंतर पक्षाचे डेप्युटी जनरल सेक्रेटरी दिनाकरन यांनी पक्षात अनेक पदे भरली. यामुळे सीएम पलानीस्वामी नाराज होते. सीएमने दिनाकरण यांनी भरलेली सर्व पदे रद्द केली आहेत. यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांत चर्चा सुरू झाली.
 - वृत्तसंस्थेनुसार, पलानीस्वामी यांनी गुरुवारी पक्षाच्या 27 सदस्यांची मीटिंग बोलावली. यात दिनाकरण आणि शशिकला यांना दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासाठी पक्षापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
पन्नीरसेल्व्हम यांची मागणी
 - पन्नीरसेल्व्हम गटाची साधी मागणी होती की, शशिकला आणि दिनाकरणसहित जयललिता यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला पक्षात ठेवू नये.
 - मीडिया रिपोर्टसनुसार, पलानीस्वामीही पक्ष आणि सरकारमध्ये शशिकला तसेच दिनाकरण यांच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होते. म्हणून त्यांनीही पन्नीरसेल्व्हम यांची मागणी सहज मान्य केली.
 
पुढे काय?
 - पुढच्या आठवड्यात दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. यासाठी AIADMK हेडक्वॉर्टरमध्ये एक कार्यक्रम होईल. यात पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्व्हम दोघेही सामील होण्याची शक्यता आहे.
 - पन्नीरसेल्व्हम डेप्युटी सीएम बनतील आणि त्यांच्या समर्थकांना कॅबिनेटमध्ये जागा दिली जाईल, असेही सूत्रांकडून कळते.
 - एवढेच नाही, तर AIADMK केंद्रात भाजप सरकारला समर्थन देऊन एनडीएचा हिस्सा बनण्याचीही शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...