आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIIMS मधील डॉ. प्रियाच्या आत्महत्येमागची कथा, अडीचवर्षे सहन केला पतीचा छळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - देशातील अग्रणी वैद्यकीय संस्था एम्समधील डॉ. प्रिया वेदी यांनी त्यांचे पती डॉ. कमल वेदी याच्यावर समलैंगिक असल्याचा आरोप करुन आत्महत्या केली. डॉ. प्रियाचे पतीवर आणि कुटुंबियांवर अतिशय प्रेम होते. तिला तिचे कुटुंब एकत्र राहावे अशी फार इच्छा होती, असे रामबाबू शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आम्हाला कळाले तिचा छळ होत आहे. तेव्हा तिने आईला याबद्दल कुठेही बोलू नको अशी शपथ दिली आणि चूप बसायला सांगितले. त्यानंतरही ती शारीरिक - मानसिक छळ सहन करत राहिली. दरम्यान तिच्या सासऱ्यांनी प्रिया व तिच्या पतीमध्ये सगळे काही ठिक होईल असे आश्वासन दिले.
राजस्थानमधील जयपूर येथील चांदपोल बाजार येथील रामबाबू यांनी सांगितले, की प्रियाने अजमेर येथील जेएलएन मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. 24 एप्रिल 2010 रोजी तिने लक्ष्मणगड येथील महेश वेदी यांचा मुलगा डॉ. कमल सोबत विवाह केला. तो तिला एक वर्ष सिनिअर होता. 2012 मध्ये कमल दिल्लीतील एम्स येथे त्वचारोग तज्ज्ञ (स्किन) तर, प्रिया 2014 मध्ये एम्समध्ये भूल तज्ज्ञ म्हणून वरिष्ठ निवासी डॉक्टर होती. दोघे एम्सच्या आयुर्विज्ञान नगर येथे राहात होते.
रविवारी सकाळी घरातून निघाली, दुपारी वडिलांना फोन केला
रामबाबू वर्मा यांनी सांगितल्यानुसार, प्रिया रविवारी सकाळी 8.30 वाजता घरातून बाहेर पडली. तिचे सासरे महेश वेदी यांनी नवी दिल्ली डिफेंस कॉलनी पोलिस स्टेशनला ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर तिचा शोध सुरु झाला. त्याच दिवशी दुपारी प्रियाने वडिलांना फोन करुन माझा फार छळ होत आहे. तुम्ही लवकर या असे सांगितले. त्यानंतर ते रविवारी रात्री दिल्लीला आले. प्रियाचे मोबाइल लोकेशन पहाडगंज भागात दाखवत होते. पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि एका हॉटेलमध्ये ते पोहोचले. ज्या हॉटेलमध्ये प्रिया थांबली होती तेथील एका रुमचा दरवाजा तोडून पोलिस आत गेले तेव्हा ती बाथरूमध्ये पडलेली दिसली. तेव्हाच तिचा मृत्यू झालेला होता. तिने मनगटाची नस कापून आत्महत्या केली होती.
साडेतीन पानांच्या सुसाइड नोटमध्ये पतीवर आरोप
पोलिसांना हॉटेलमधील रुममधून साडेतीन पानांची सुसाइड नोट सापडली. त्या प्रियाने तिच्या पतीवर समलैंगिकतेचा आरोप केला होता. त्यात तिने लिहिले आहे, की काही दिवसांपूर्वी कमलने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्याला तिच्यापासून घटस्फोट हवा होता. त्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. तिने 17 एप्रिलला ही गोष्ट तिच्या आईला सांगितली होती.
तज्ज्ञांचे मत - अशा परिस्थितीत घटस्फोट घेणेच योग्य
जवळपास एका दशकापूर्वी समलैंगिकता हा एक रोग मानला जात होता. मात्र, आता तसे नाही. आता एखाद्याल जसा लाल रंगाचा शर्ट आवडतो आणि एखाद्याला काळ्या रंगाचा, तसेच हे प्रकरण आहे. अशा लोकांना समजून घेणे अवघड आहे. अशा केसेसे येतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनाच समजावून सांगितले जाते, की जे लोक गे आहेत त्यांना तसेच स्विकारा. हा काही रोग नाही, तर समाजात अशा गोष्टी कित्येक दिवसांपासून नित्य व्यवहारातील झाल्या आहेत. ही कॉमन बाब समजली जात आहे. आता फक्त लोक मोकळेपणाने असे संबंध स्वाकरत आहेत आणि ते उघड होत आहे एवढेच. पती-पत्नी संबंधात अशा वेळी वेगळे होणेच (घटस्फोट घेणे) सोयीस्कर ठरते. कारण यातून आत्महत्यांचे प्रकार वाढू शकतात. त्यामुळे याकडे वैज्ञानिक दृष्टीकोणातून पाहाणे योग्य आहे.

तज्ज्ञ - डॉ. प्रदीप शर्मा
मानसशास्त्र विभाग प्रमुख, एसएमएस मेडिकल कॉलेज.

तज्ज्ञ - डॉ. अमित गुप्ता
एम्समधून एमडी .
फोटो - पती डॉ. कमल सोबत डॉ. प्रिया (फाइल फोटो)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेसंबंधीत छायाचित्र