आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AIMIM Chief Asaduddin Owaisi Threaten By Isis On Twitter

ISIS विरुद्ध जाहीर बोलल्याने असदुद्दीन ओवेसींना ट्विटरवर धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरुद्ध बोलल्याबद्दल इसिसने धमकावले आहे. सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून या धमकीला आपण घाबरत नसल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांच्या ट्विटर वॉलवर ही धमकी देण्यात आली आहे. ‘सत्य तुम्हाला माहिती नसेल तर इस्लामिक स्टेटबद्दल तुम्ही तोंड बंद ठेवलेलेच बरे. इसिस लवकरच भारतावरही आक्रमण करेल,’ असे या धमकीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हे ट्विट काही वेळातच उडवण्यात आले. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ओवेसी म्हणाले, ट्विटरवर जर कुणी भारतावर आक्रमण करण्याची धमकी देत असेल तर आम्ही पण त्याना चोख प्रत्युत्तर देऊ. भारत आमची मातृभूमी आहे. इसिसचा इस्लामशी काही संबंध नाही. या संघटनेने आजवर मुस्लिमांसह सर्वच धर्मांच्या निष्पाप लोाकांचे प्राण घेतले आहेत. इसिसचे विचारच मुळातच एक घातकी मानसिकता आहे.

जे भारतविरोधी, त्यांना आमचा कायम विरोध
हा दहशतवादी माणूस जगात कोणत्या कोपऱ्यात उंदरासारखा लपून धमक्या देत आहे, हेच कळत नाही. जे भारताच्या विरोधात आहेत एमआयएम त्यांना कायम विरोध करेल. आपला पक्ष गेल्या तीन वर्षांपासून इसिसविरुद्ध सातत्याने बोलत आहे. या दहशतवादी संघटनेचा एमआयएमने नेहमी निषेधच केला आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

> इसिसच्या विचारांना जगभरातील मुस्लिम विरोध करत आहेत. अशा संघटनेच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. असे दुष्ट विचार नष्ट करण्याची आज गरज आहे. जगातील सर्वच मुस्लिम या संघटनेच्या विरोधात आहेत. काही विचारवंतांनी तर इसिसविरुद्ध फतवेही काढले आहेत.
- असदुद्दीन ओवेसी, एमआयएमचे प्रमुख