आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • AIMIM To Contest Bihar Elections From Seemanchal: Owaisi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमधील राजकीय दंगलीत ओवेसींची उडी; सीमांचलमध्‍ये जोर लावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद | पत्रकार परिषदेत बोलताना असदुद्दीन आेवेसी. सोबत सहकारी. - Divya Marathi
हैदराबाद | पत्रकार परिषदेत बोलताना असदुद्दीन आेवेसी. सोबत सहकारी.
हैदराबाद / पाटणा - देशाचे लक्ष लागलेली बिहारची निवडणूक आता आणखीनच रंगणार आहे. कारण वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांचा पक्ष सीमांचलमधील काही जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

ओवेसी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची घोषणा केली. परंतु सीमांचलमधील नेमक्या किती जागा लढवणार आहोत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. आम्ही सीमांचलपर्यंत मर्यादित आहोत. विजयाची शक्यता किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला आमची बलस्थाने आणि कमकुवत बाजू ठाऊक आहे. विकासाच्या निकषावर बिहार खूप पिछाडीवर आहे. विशेषत: सीमांचलची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळेच आम्ही कलम ३७१ अंतर्गत तेथे विकास परिषदेची स्थापना करावी, अशी मागणी करत आहोत, असे आेवेसी म्हणाले. आपला पक्ष मुस्लिम मते खाणार आहे. त्याचा फायदा एनडीएला होणार आहे. त्यावर आेवेसी म्हणाले, हा चुकीचा आरोप आहे. त्याला काहीही आधार नाही. मी निवडणूक लढवली नाही. अशा ठिकाणी देखील एनडीए विजयी झाला आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही लढलो नाहीत. तेथेही एनडीएचा विजय झाला आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा इतर जागांवरही प्रभाव शक्य