आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - चक्क सेंट्रल जेलमध्ये उतरले हॉट एअर बलून, पोलिसांसमवेत गुप्तचर संघटनांना बसला धक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉट एयर बलून एलपीजीवर चालतात. यामध्ये सिंगल ते 4, 8 आणि 16 लोकांपर्यंत बसण्याची व्यवस्था असते.)

अजमेर -
पाकिस्तानवरून पुष्कर जत्रेत बॉम्ब स्फोट करण्याची धमकी मिळाली असतानाच मंगळवारी एक हॉट एअर बलून अजमेर सेंट्रल जेलमध्ये उतरले. तर दुसरा बलून गर्दीचे ठिकाण असलेल्या वैशाली नगर जवळील एका मुकबधीर शाळेत उतरला. या दोन्ही घटनांनी गुप्तचर संघटना सतर्क झाल्या. अचानक आलेल्या या बलून मुळे शाळेत धावपळ सुरू झाली. तर जेलमध्ये हाय अलर्ट जारी केला. हे दोन्ही हॉट एअर बलून परदेशी पर्यटकांचे होते. या बलूनला कडक सुरक्षेत जेलमधून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या प्रकारात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र या घटनेमुळे जिल्हा प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणांचे पितळ उघडे पडले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा कलेक्टर डॉ. आरुषी मलिक आणि आयजी अमृत कलश यांनी दिले आहेत.
आम्हाला मोकळे मैदान दिसले त्यामुळे आम्ही बलून खाली उतरवले : कंपनी
हॉट एअर बलूनचे मार्केटींग मॅनेजर कपिल शर्मा यांनी सांगितले की, हे बलून एखादे सुरक्षित ठिकाण पाहून उतरवावे लागते. ऑपरेटरला उंचीवरून हे कळाले नाही की, ज्या ठिकाणी आपण बलून उतरवत आहोत, तो परिसर जेलचा आहे. या बलूनमध्ये वेस्टइंडिजच्या दोन महिला पर्यटक आणि ऑपरेटर धवल केदारनाथ हे होते. हे या बलूनमध्ये चार जण बसू शकतात.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या घटनेचे फोटो...