आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Force Shoots Down Unidentified Balloon Shaped Object In Rajasthan

पाकमधून आलेल्या बलूनवर लिहिले होते ‘हॅप्पी बर्थ डे’; Air Force ने 15 मिनिटांत केला नष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/नवी दिल्ली - 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानच्या दिशेने आलेला एक बलून (फुगा) जोधपूरमध्ये सुखोई 30 एमकेआयने हवेतच नष्ट केला. बलूनवर ‘हॅप्पी बर्थ डे’ लिहिले होते. बलून पाली जिल्ह्यातील गुंदोज गावातील शेती परिसरात पडला.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत बलून ताब्यात घेतला असून तो एअरफोर्सच्या ताब्यात दिला आहे. या दरम्यान दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळही बुधवारी एक संशयास्पद बलून आढळला होता. तसेच मंगळवारी बाडमेर आणि पाली जिल्ह्यांमध्ये पाडलेल्या संशयास्पद बलूनबाबत बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हे बलून पाकिस्तानातून आले होते, असे सांगितले. विशेष म्हणजे सुखोई विमानांचा वापर करून हा बलून पाडण्यात आला.

संशयास्पद साहित्य मिळाल्याच्या वृत्ताला लष्कराने दिला होता दुजोरा
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सापडलेल्या बलूनवर यूएसए असे लिहिलेले आहे. मात्र त्याबाबत लष्कराचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
- आज आणि मंगळवारी आढळलेले बलून हे तीन मीटर रूंद आणि आठ फूट लांबीचे असल्याचे सांगितले जात आहे.

गुडगावकडून दिल्लीकडे आला बलून
- बुधवारी सायंकाळी दिल्लीच्या IGI एअरपोर्टजवळ आयानगर परिसरात बलून आढळून आला.
- हा बलून गुडगावकडून आला होता, असे सांगण्यात आले आहे.
- बलून पाहिल्यानंतर सेक्युरिटी एजन्सींना अलर्ट करण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बाडमेरच्या मोखाबमध्ये बलून पाडल्यानंतरचे PHOTOS
फोटो : पालीहून मनीष शर्मा आणि बाडमेरहून लाखाराम जाखड.