आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरफोर्सचे मानवरहित विमान कोसळले; मिसाईल हल्‍ला झाल्‍याची अफवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्‍थान) - इंजीनमध्‍ये तांत्रिक बिघाड झाल्‍याने इंडियन एअरफोर्सचे ड्रोन (मानवरहित विमान) आज (गुरुवार) बाडमेर जिल्‍ह्यातील एका शेतात कोसळले. या घटनेत कोणतेही नुकसान झाने नाही. दरम्‍यान, विमान कोसळल्‍याने मोठा आवाज झाला. त्‍यामुळे मिसाईल हल्‍ला झाल्‍याची अफवा पसरली. परिणामी, नागरिक भयभीत झाले होते. नंतर या विमानाला शोधण्‍यासाठी एअरफोर्सचे अधिकारी आल्‍याने नागरिकांनी सुकेचा निश्‍वास टाकला. हा अपघात कसा झाला, याच्‍या चौकशीचे आदेश भारतीय वायू सेनेने दिले आहेत.
प्राप्‍त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे एअरफोर्सचे मानवरहित विमानाने जैसलमेरमधून उड्डाण भरली. अर्ध्‍या तासानंतर नियंत्रण कक्षासोबतचा त्‍याचा संपर्क तुटला. त्‍यानंतर वायू दलाने त्‍याची शोध मोहीम सुरू केली. एका गावात ते पडलेले दिसून आले. पडलेल्‍या विमानाला पाहण्‍यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्‍यान, मिसाईल हल्‍ला झाला, अशीही अफवा पसरली. त्‍यामुळे नागरिक भयभीत झाले होते.
सीमाभागात टेहळणी करण्‍यासाठी उपयोग
सीमा भागात टे‍हळणी करण्‍यासाठी ड्रोनचा (मानव रहित विमान) मोठा उपयोग होतो. सैन्‍याच्‍या तीनही विभागांकडे 20 वर्षांपासून ड्रोन आहेत. ते सर्व इस्राहिल बनावटीचे आहेत. ड्रोन 100 ते एक हजार किलोमीटरपर्यंत सलग उडत राहू शकते. दरम्‍यान, त्‍या परिसरातचे फोटोसुद्धा त्‍याच्‍याकडून काढले जाऊन ते नियंत्रण कक्षाला पाठवले जातात.