आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रभर हवाईसुंदरीने केली पार्टी, सकाळी रस्त्यावर आढळला विवस्त्र मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासगी विमानसेवेत लीड केबिन अटेेंडंट होती क्लारा. - Divya Marathi
खासगी विमानसेवेत लीड केबिन अटेेंडंट होती क्लारा.
कोलकाता - इंडिगो एअरलाइन्सच्या एका हवाईसुंदरीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. बुधवारी सकाळी शिलाँगची राहणारी क्लारा खोंगशिक (22) हिचा अर्धनग्नावस्थेतील मृतदेह अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्यावर आढळला. हवाईसुंदरीने मंगळवारी रात्री अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमध्ये बर्थ-डे पार्टी दिली होती. पोलिसांनुसार, मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही, तथापि, यामागे लव्ह ट्रँगलचे कारण सांगितले जात आहे.
 
अपार्टमेंटमध्ये सर्वात वर आहे फ्लॅट
- क्लारा खोंगशिक इंडिगो एअरलाइन्समध्ये लीड केबिन अटेंडंट म्हणून काम करायची. तिचा कोलकाताच्या केस्टोपूर एरियात फ्लॅट आहे. हा परसिरात विमानतळाच्या अगदी जवळ आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्लाराला तिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच हा फ्लॅट घेऊन दिला होता. हा फ्लॅट अपार्टमेंटच्या सर्वात वर चौथ्या मजल्यावर आहे.
- पोलिस सूत्रांनुसार, मंगळवारी रात्री क्लाराने फ्लॅटवर आपल्या एका मित्राच्या बर्थडेची पार्टी साजरी केली.
 
फ्लॅटमध्ये होते नशेत धुंद झालेले 2 तरुण 
- बुधवारी सकाळी बागैती पोलिस स्टेशनला एका मुलीची बॉडी रस्त्यावर पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता कळले की, मृत तरुणी समोरच्याच फ्लॅटमध्ये राहते. फ्लॅटमध्ये गेल्यावर तिथे नशेत धुंद झालेली 2 मुले आढळली. तेथे बिअरच्या अनेक बाटल्याही आढळल्या. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.
 
पार्टीमध्ये होते 4 जण
- पोलिसांनी आसपासच्या लोकांकडून घेतलेल्या माहितीनुसार, बर्थडे पार्टीत 4 जण होते. लोक म्हणाले की, क्लाराच्या फ्लॅटमधून रात्री उशिरापर्यंत पार्टीचा आवाज येत होता.
- ही आत्महत्या आहे की खून, याचा पोलिस शोध घेत आहेत. अटॉप्सी रिपोर्ट अद्याप आलेली नाही. क्लाराच्या दोन्ही मित्रांचीही चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली.
- एअरलाइन्सचे काही अधिकारीही बुधवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. एक अधिकारी म्हणाले की, आम्हाला मीडियातूनच याबाबत कळले. पोलिसांचा तपास सुरू असून आम्ही यावर कोणतीही कॉमेंट करणार नाही.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...