आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडिया सात ड्रीमलायनर विकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -भारतातील आघाडीची विमान कंपनी एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सात बोइंग 787 - 8 ड्रीमलायनर विमाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानांच्या विक्रीतून 84 कोटी डॉलरची (सुमारे 52 अब्ज 8 कोटी रुपये) रक्कम एअर इंडिया उभी करणार आहे. या विमानांची विक्री केल्यानंतर नवी विमाने खरेदी करण्याऐवजी विकत घेण्याची कंपनीची योजना आहे.
एअर इंडियावर सध्या बरेच कर्ज आहे. विमान विक्रीतून मिळालेली रक्कम कंपनी ब्रीज लोन (मोठे कर्ज मिळण्यासाठी सुरुवातीला घेतलेले कर्ज) चुकवण्यासाठी करणार आहे. प्राप्त रकमेपेकी काही रक्कम विमान पत्तनीकरणावरही खर्च केली जाण्याची शक्यता आहे. विमान कंपनीने बोइंगकडून 11 ड्रीमलायनर विमाने खरेदी केली आहेत. तसेच याच प्रकारातील आणखी तीन विमाने पुढील वर्षी मार्चपर्यंत एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
कर्ज फेडण्यासाठी घेतला निर्णय, विमाने भाड्याने घेण्याची योजना
सूत्रांनी सांगितले की, आम्ही बोइंग 787 -8 ड्रीमलायनर प्रकारातील सात विमाने विक्रीला काढली आहेत. नंतर हीच विमाने भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहेत. विमान विक्रीतून मिळणारी रक्कम कर्जांची परतफेड करण्यासाठी खर्च केली जाईल. ही विमाने खरेदीसाठीच हे कर्ज घेतले होते. व ते वरचेवर वाढत आहे.
विमान विकून भाड्याने घेणे ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यात विमानाची मूळ मालक कंपनी विमान भाड्याने घेणाºया कंपनीस विकते. नंतर दीर्घकाळासाठी ती भाडेतत्त्वावर त्याचा वापर करते. एअर इंडियाने जानेवारी 2006 मध्ये 27 ड्रीमलायनर विमाने, 41 बी - 777 व बी - 737-800 विमानांसह 68 विमानांची ऑर्डर बोइंग कंपनीला दिली होती.
कर्ज फेडण्यासाठी घेतला निर्णय, विमाने भाड्याने घेण्याची योजना

विमाने विकून भाड्याने घेणार