आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India's Show Inauguration In Bangalore News In Divya Marathi

पाच वर्षांत 70 टक्के संरक्षण सामग्री "मेड इन इंडिया' असेल: पंतप्रधान मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बंगळुरू) - संरक्षण क्षेत्रातील विविध वस्तूंचा क्रमांक एकचा आयातदार देश अशी जगात भारताची प्रतिमा तयार झाली आहे. ही प्रतिमा आम्हाला मिटवायची असून निर्यातीत आपले सामर्थ्य वाढवायचे आहे. पुढील पाच वर्षांत ७० टक्के संरक्षण सामग्री भारत देशातच तयार करेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. बंगळुरू येथे आयोजित १० व्या एअरो इंडिया शो च्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी ते बोलत होते. या शो मध्ये २५० देशी व ३०० पेक्षा जास्त विदेशी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
मोदी म्हणाले आशियातील छोट्या देशांमध्ये निर्यातीच्या खूप संधी आहेत. या संधी भारताला सशक्त आणि समृद्ध बनवतील. या मंचावरून आम्ही हे लक्ष्य निश्चित केले आहे की, पुढील पाच वर्षांत भारत ७० टक्के संरक्षण सामग्री देशातच बनवू लागेल. यातून १ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील. संरक्षण उद्योगात पुढील दशकांत दोन लाख कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. एअरो इंडिया शो चे उद््घाटन पंतप्रधानांनी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या वेळी बोलताना मोदी यांनी त्यांच्या भाषणात इतर देशांतून केली जाणारी संरक्षण खरेदी कमी करण्यावर विशेष भर दिला. देशांतर्गत संरक्षण उद्योग हा मेक इन इंडियाचा आत्मा आहे. तो साकार करण्यासाठी आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावे लागेल. हे काम आपल्या मिशन म्हणून पूर्ण करायचे आहे.
डीआरडीओमध्ये काम प्रलंबित नाही
या समारंभात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, वायूदल प्रमुख अरूप राहा हेही उपस्थित होते. नव्या डीआरडीओ प्रमुखांच्या नियुक्तीला विलंब होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले, देशभरात डीआरओला सात कलेक्टर्सना आवश्यक सामग्री खरेदी व त्यासंदर्भातील आर्थिक अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोणतेच काम अडलेले नाही. संघटनेच्या प्रमुखांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.

"मेक इन इंडिया' फॉर्म्युल्यानुसार ३८८ हेलिकॉप्टरची खरेदी
संरक्षण मंत्री मनाेहर पर्रीकर यांनी सांगितले, वायूदलासह तिन्ही विभागांसाठी हेलिकॉप्टरची कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी ३८८ हेलिकॉप्टर मेक इन इंडिया फॉर्म्युल्यानुसार केली जाणार आहे. काही कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रमासाठी बोलणी सुरू आहेत.

राफेल सौद्याचा प्रश्न टाळला
पर्रीकर यांनी फ्रान्सची लढाऊ विमान कंनी डॅसो राफेलच्या सौद्याशी संबंधित प्रश्नावर भाष्य करणे टाळले. याबाबत ते म्हणाले, याबाबत आताच काही सांगणे शक्य नाही. एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफच्या पातळीवर अधिका ऱ्याकडून अहवाल मागितला आहे. ती या महिनाअखेरीपर्यंत मिळेल. त्यानंतरच निर्णय होईल. फ्रान्सकडून ही लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.