आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षांचे कठीण ट्रेनिंग, तावून-सलाखून निघतात एअरफोर्सचे गरुड कमांडो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - परिस्थिती कोणतीही असू द्या. हवाई हल्ला असेल नाही तर भूलोकी आलेले एखादे संकट, इंडियन एअरफोर्सचे गरुड वीजेच्या वेगाने शत्रूंवर तुटून पडतात. आकाशाहून उंच ध्येयासक्ती, धरती हलवण्याची ताकद आणि समुद्राच्या तळाशी जाऊन हल्ला करण्याची क्षमता असलेले हे कमांडोज केवळ आपले संरक्षण करत नाही तर, शत्रूच्या घरात घुसून त्याला मारण्याची क्षमता यांच्यात असते.
एअरफोर्सच्या स्पेशल फोर्ससाठी गरुड कमांडोजची जोधपूरमध्ये प्रथमच सरळ सेवा भरती केली जाणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ही भरती प्रक्रीया सुरू होईल. त्यानिमीत्ताने divyamarathi.com गरुड कमांडोजच्या वैशिष्ट्यांची वाचकांना ओळख करुन देत आहे. त्यांची ट्रेनिंग कशी असते याबद्दल सांगत आहे.
दीड वर्षांचे अग्निदिव्यातून तावून-सलाखून निघतात
देशभरात जवळपास 2000 गरुड कमांडो आहेत. त्यांना दीड वर्षांच्या अत्यंत कठीण प्रशिक्षणातून जावे लागते. ट्रेनिंग एवढे कठीण असते, की सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांतच अर्ध्याहून अधिक तरुण सोडून निघून जातात. ट्रेनिंग दरम्यान खवळलेल्या नदीतून, आगीच्या ज्वाळांमधून सुरक्षित बाहेर पडावे लागते, कोणत्याही आधाराशिवाय डोंगर चढून जावे लागते. पाठीवर भलेमोठे ओझे घेऊन कित्येक किलोमीटरचे अंतर पायी पार करायचे असते. घनदाट जंगलांमध्ये रात्रीचा मुक्काम करावा लागतो, हा सर्व ट्रेनिंगचा भाग असतो. अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांनी सज्ज हे जवान हवाई हल्ला करण्यापासून शत्रूच्या भागात जाऊन त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी सज्ज असतात. स्पेशल कॉम्बॅट आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी (बचाव कार्य) त्यांची तयारी करुन घेतली जाते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गरुड कमांडोजचे PHOTOS..