आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 17 वर्षे, 2 वर्षांत दोनदा निकाह, 4 वेळा विकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तिला आएशा म्हणा, फातिमा अथवा सैफिया. ती जुन्या हैदराबादची रहिवासी. 17 वर्षांची निरक्षर, परंतु आयुष्यातील भयंकर अनुभवांनी तिला शिकवले. दोन वर्षांत दोन निकाह. मग तलाक. चार वेळा विकण्यात आले. आता आपल्यावर गुदरलेले प्रसंग, छळाची कहाणी तिला जगाला सांगायची आहे.


* केवळ दोनच तारखा मला आठवतात. 2 फेब्रुवारी 2012 आणि 14 फेब्रुवारी 2014. या माझ्या निकाहच्या तारखा आहेत. अब्बांनी निकाहसाठी पहिल्या वेळेस मला तयार केले त्या वेळी आनंद व्यक्त करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असेच होते. ते नागपूरमधील कुणी हाजी बशीर होते. त्यांचा उद्योग-व्यवसाय माहिती नाही. परंतु धनाढ्य असामी होती. निकाहच्या वेळेस समोर पाहिल्यावर घाबरले. त्यांचे वय माझ्या अब्बूपेक्षाही जास्त होते. निकाहच्या एक-दीड महिन्यानंतर नागपुरात गेले. ते आधीपासूनच विवाहित. मुलंबाळं होती. अब्बूंनी त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. त्यानंतरही अनेक वेळा पैसे घेण्यासाठी अब्बू येत होते. सगळं व्यवस्थित सुरू होतं. अचानक काहीतरी बिनसलं.अब्बूने त्यांच्याकडून मला तलाक घेऊन दिला. बशीर यांनी तलाक दिला नव्हता. आम्हीच घेतला.


* आता तारीख लक्षात नाही. अब्बू व फुफी (आत्या) मला मुंबईला घेऊन आले. एका घरात देण्याघेण्याच्या गोष्टी झाल्या. अब्बूंना 30 हजार रुपये मिळाले. आता एक अरब शेख समोर होता. त्याचे नाव मलाही माहिती नाही. त्याला हिंदी येत नव्हते. मला त्याच्यासोबत सोडून देण्यात आले. तो माझ्याजवळ एकटा आला नाही, आणखी पाच जण सोबत होते. त्या वेळी भीती काय असते याची जाणीव झाली. मी तिथून पलायन केले.
* चार महिने उलटले. आता आणखी एक शेख तयार होता. हा सौदा 20 हजार रुपयांचा होता. हैदराबादेत केवळ एक-दोन दिवसांसाठी.
* साठ वर्षांचा जमाल नावाचा एक माणूस. तो लंडनचा होता. तो 50 हजार रुपयांच्या मोबदल्यात मला आठ दिवसांसाठी पुण्याला घेऊन गेला. घरी परतल्यानंतर अब्बूंना खडसावले. पुन्हा असे करू नका. त्यांनी माझे डोकेच फोडले. माझ्यासोबत व माझ्या अम्मीसोबत ते नेहमी असेच वागायचे. आम्ही हतबल होतो.
*रेहाना नावाची एक आंटी आहे. बाहेरच्या शहरांमध्ये त्यांचे खूप संबंध आहेत. 30 हजार रुपयांच्या मोबदल्यात मला आणखी एका व्यक्तीच्या हवाली करण्यात आले. हैदराबादच्या हॉटेलात एक दिवसासाठी. मी पुन्हा अब्बूला बोलण्याचा प्रयत्न केला पण...
* रेहानाच्या माध्यमातून आता 30 वर्षांचा मन्नान
माझ्या आयुष्यात आला. तो सुदानचा होता. एक लाख रुपयांचा सौदा. आमचा निकाह झाला. आता माझा संयम सुटला. मन्नान मला नेण्यासाठी घरी येण्याअगोदरच मी आपल्या ताईकडे पळाले. केवळ त्यांच्यावरच विश्वास होता. ताईने मला वाचवले. वकील जया मॅडमकडे घेऊन आल्या. त्यांना मी आपली कहाणी कथन केली.आम्ही पोलिसांकडे गेलो व अब्बूला पकडले, तर ते मलाच जिवे मारण्याची धमकी देत होते. पण मी आता कुणाला घाबरणार नाही.
* माझ्या अब्बूचे चार निकाह झाले. माझी आई पहिली तर चौथी अम्मी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. माझी अम्मी व मी दोघेही अंगठेबहाद्दर.केवळ ताईवर मला विश्वास होता. माझी तिसरी अम्मी निलोफरने अब्बूला फूस लावली.
मुलीने हिंमत दाखवली
अशा प्रकरणांमध्ये मुली धाडस दाखवत नाहीत, हिने दाखवले. आम्ही तत्काळ पाच जणांना अटक केली. या नेटवर्कची पाळेमुळे खणून काढू.
-अनुराग शर्मा, पोलिस आयुक्त, हैदराबाद
- पीयूसीएलच्या अध्यक्षा व तरुणीच्या वकील जया विद्याला म्हणाल्या, निकाहच्या नावावर मुलींना विकण्याचे उद्योग राजरोसपणे सुरू आहेत. हे नेटवर्क हैदराबादपासून मुंबईपर्यंत फै लावलेले आहे.हे प्रकरण या अवैध धंद्याला आळा

घालण्याइतपत मजबूत आहे.
कहाणीचे पाच पात्रे : हैदराबादच्या कंचनबाग पोलिस ठाण्यात तरुणीचा पिता मोहंमद अकबर, त्याची तिसरी पत्नी निलोफर, मन्नान आणि दोन दलाल रेहाना व अहमद यांच्याविरोधात कलम 376,370 ए , बालविवाह आदी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.