आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमानवी कृत्याच्या व्हिडिओप्रकरणी कारवाई, डोभाल यांना दिली काश्मीर प्रकरणाची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी रविवारी काश्मीरमधील सद्य:स्थितीची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना दिली. लष्कराच्या वाहनासमोर एका नागरिकाला बांधून फिरवत असल्याचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
 
रावत यांनी अमानवीय कृत्याची माहितीही डोभाल यांना दिली आहे. श्रीनगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान ९ एप्रिल रोजी बडगाममधून हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी लष्कराविरोधात आंदोलन सुरू केले. याप्रकरणी योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन रावत यांनी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना आधीच दिले आहे. दरम्यान, डोभाल यांना काश्मिरातील परिस्थितीचा आढावाही रावत यांनी दिला आहे. या घटनेवरून उलटसुलट चर्चा होत आहे.

मतदान करून येत असताना दगडफेकीतील आरोपी समजून बांधले: पीडिताचा जबाब
जम्मू-काश्मीरमध्ये एका व्यक्तीस लष्कराच्या जवानांनी जीपला बांधून धिंड काढल्याच्या घटनेतील वाद पुन्हा चिघळला आहे.  हा  तरुण  बडगामचा फारुख दार आहे.  आपण ९ एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदान करून बहिणीच्या घरी चाललो होतो, असा खुलासा त्याने केला आहे. याच वेळी आपणास सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्यांपैकीच एक असल्याचे समजून पकडले, असे त्याने म्हटले. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी त्या प्रसंगाचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला होता.   दगडफेक करणाऱ्यांचे असेच हाल केले जातील, असा आवाज व्हिडिओमध्ये एेकू येत होता. नंतर हा वाद चिघळला.
 
बातम्या आणखी आहेत...