आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली सोडून पंतप्रधान राज्यास सभा घेत फिरतात; अजितदादांचा भाजपसह काँग्रेसवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारव्हा - माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यवतमाळमधील दारव्हा येथे झालेल्या सभेत निवडणुकीतील सर्व विरोधकांवर चौफेर टीका केली. पण प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसला त्यांनी लक्ष्य केले. यवतमाळ माणिकराव ठाकरेंचा जिल्हा असल्याने ज्यांना स्वतःच्या जिल्ह्याचा विकास करता येत नाही, ते राज्य काय चालवणार असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी पंतप्रधान दिल्ली सोडून राज्यात सभा घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

दारव्हा येथील सभेत अजित पवारांनी प्रामुख्याने काँग्रेस, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याच जिल्ह्यातले आहेत. मुख्यमंत्रीही त्यांच्याच पक्षाचे होते. पण तरीही त्यांना विकास करता आलेला नाही. त्यांना साधे साखर कारखानेही चालवता आलेले नाहीत. मग ज्यांना त्यांच्या भागाचा विकास करता येत नाही ते राज्याचा विकास काय करणार अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

भाजपवर सडकून टीका
भाजपवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे येथे सगळे सहकारी (सर्व पक्ष) एक विचाराने राहतात. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज सगळे एकमेकांवर तुटून पडले आहेत. त्याची कारणेही तशीच आहेत. पंतप्रधान राज्यात सभा घेत आहेत. ज्यांनी दिल्लीत राहून देशाचा कारभार पाहायचा, नागरिकांचे संरक्षण करायचे ते इकडे फिरत आहेत. लोकसभेच्या वेळीही ते यायचे. त्यावेळी त्यांनी अच्छे दिनची स्वप्ने दाखवली. पण त्याचे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. भाजपचे दाखवायचे दात कोणते आणि खायचे कोणते हे सर्वांसमोर आले आहे. भाजपला अचानक निवडणुकांच्या तोंडावर शिवछत्रपती कसे आठवले. मोदी मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी जहरी टीका अजित पवारांनी केली.

राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरे एकदा म्हणतात, मी निवडणुकीत उभा राहील. दुस-यांदा म्हणतात मी निवडणूक लढवणार नाही. राज ठाकरे एकदा म्हणतात लढणार तर एकदा म्हणतात लढणार नाही. तुम्हाला कोणी विचारले होते का? तुम्हीच सभा घेऊ घोषणा केली. त्यांचे आपसांतच भांडणे सुरू आहेत. त्यांना राज्याच्या विकासाच्या मुद्याशी काय देणे घेणे असे अजितदादा म्हणाले.

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरूनही टीका
मोदी राज्यात येऊन सभेत सांगतात की, मी दिल्लीत आहे तोवर राज्य तोडू देणार नाही. लगेचच त्यांचे नेते म्हणतात आम्ही काही झाले तरी वेगळा विदर्भ घेऊनच राहणार. त्यामुळे हे केवळ धुळफेक करत आहेत. जनतेनेही हे लक्षात ठेवून त्यांना धडा शिकवायला हवा असे आवाहन अजित पवार यांनी केले.