आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MYTH: मुंग्यांसारखे धावत येतात लोक, हिंदू परिवार करतो उरुसाची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - राजस्थानच्या अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहमतुल्ला यांच्या 803व्या उरुसाची सुरुवात झाली आहे. या दर्ग्याची विशेषता म्हणजे येथे सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने येतात. त्यासाठी कोणताही प्रचार केला जात नाही, की गर्दी खेचण्यासाठी कोणत्याही सेलिब्रिटीला बोलावण्यात येत नाही. 803व्या उरुसाच्या निमीत्ताने जाणून घेऊया या दर्ग्याच्या इतिहासाबद्दल.
अजमेरच्या दर्ग्याची ख्याती भारतातच नाही तर परदेशातही आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ देखील येथे माथा टेकण्यासाठी आले होते. मुंग्या जशा आपल्या वारुळाकडे धावत जात असतात तसे जगभरातून लोक अजमेर शरीफ येथे दर्शनासाठी येतात. यात मुस्लिमांसह इतर धर्मियांची संख्याही मोठी असते. आजमेरच्या गरीब नवाजचे आकर्षण बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही आहे. येथील मुख्य उत्सव आहे उरुस. इस्लामिक कॅलेंडरनुसार रजब महिन्याच्या एक ते सहा तारखेपर्यंत हा उरुस साजरा केला जातो. या उरुसाची सुरुवात ही अनोखी आहे. बाबाच्या मजारवर हिंदू कुटुंबाकडून चादर चढवली गेल्यानंतरच उरुसाची सुरुवात होते, हे विशेष.
सुफी युगाची सुरुवात
भारतातामध्ये इस्लामचा प्रवेश झाला त्यासोबतच सुफी संत देखील त्यांच्यासोबत आले. या दोन्हींची भारतातील सुरुवात एकाच कालखंडीतल आहे. सुफी संत एक इश्वरवादी आहेत. त्यापैकीच एक होते ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहमतुल्ला. असे सांगितले जाते, की ख्वाजा साहेबांचा जन्म इराणमध्ये झाला होता. मग ते भारतात आले आणि येथील होऊन राहिले. अशी अख्यायिका सांगितली जाते, की शहनशहा अकबर पुत्र प्राप्तीची इच्छा घेऊन ख्वाजा साहेबांच्या दर्ग्यात आला आणि 'मन्नत' मागितली की मला जर पुत्र झाला तर मी अजमेरला पायी चालत येईल. ख्वाजा साहेबांच्या आशीर्वादाने बादशहाला पुत्र रत्न झाले आणि ते ऋण व्यक्त करण्यासाठी अकबर बादशहा आमेर ते अजमेर पायी चालत आला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ख्वाजा दर्गा आणि जाणून घ्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींचा इतिहास