आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेचा रुबाब दाखवत सरपंचाने नर्सच्या श्रीमुखात भडकवली, अब्रुवर हात टाकल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाघापुराना (पंजाब) - सत्तेचा रुबाब झाडत पंजाबातील एका सरपंचाने खासगी हॉस्पिटलमधील गर्भवती नर्सला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना पंजाबमधील मोगा येथील मुदकी रोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये घडली. आलमवाला गावचे सरपंच एका पेशंटचे बील भरण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यापूर्वी त्यांना डॉक्टरांची भेट घ्यायची होती. नर्सने त्यांना दहा मिनीट थांबण्यास सांगितले तर सरपंच संतप्त झाले.
काय आहे प्रकरण
- नर्स रणदीप कौर यांनी सांगितले, की गुरुवारी दुपारी सुमारे 1 वाजता आलमवाला गावचे सरपंच परमजीत सिंग आणि त्यांचा मुलगा गुरजीत सिंह एका पेशंटचे बील भरण्यासाठी डॉ. राहुल यांच्याकडे गेले.
- डॉक्टरने त्यांना 10 मिनिट बाहेर थांबण्यास सांगितले.
- त्याचवेळी अकाली दलाचे सरपंच परमजीतसिंग यांनी डॉक्टरांना अपशब्दांचा वापर केला.
- नर्सने वाद शांत करण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर वयोवृद्ध सरपंचांनी तिला धक्का देऊन खाली पाडले आणि श्रीमुखात लगावली.
- या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाघापुराना येथील काँग्रेसचे माजी आमदार दर्शनसिंग बराड समर्थकांसह हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यासोबतच आप नेतेही दाखल झाले. त्यांनी नर्सबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
गर्भवती महिलेला पाठीला आणि हाताला दुखापत
- महिला नर्सच्या पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे.
- पीडित नर्स रमनदीप कौरच्या जबाबावरुन पोलिसांनी अकाली दलाचे सरपंच परमजीत सिंग आणि त्यांच्यामुलाविरोधात 323, 451 आणि 506 कलमानुसार (मारहाण आणि महिलेचा विनयभंग) गुन्हा दाखल केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नर्सला मारहाणीचा व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...