आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधेमाँ, आसाराम, राम रहीमसह 14 बाबांना केले ढोंगी घोषित, कुंभमेळ्यात प्रवेशाला केली मनाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यादीमध्‍ये आसाराम आणि राधे मां यांचा समावेश आहे. - Divya Marathi
यादीमध्‍ये आसाराम आणि राधे मां यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली- अखिल भारतीय आखाडा परिषदेने १४ ढोंगी बाबांची यादीच जारी केली आहे. हिंदू साधू-संतांची सर्वाेच्च संस्था असलेल्या अाखाडा परिषद कार्यकारिणीच्या अलाहाबादेतील बाघंबरी गद्दी येथे झालेल्या बैठकीत रविवारी ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीत नुकतेच बलात्काराच्या आरोपात तुरुंगात रवानगी करण्यात आलेले गुरमीत राम रहीम, आसाराम, त्यांचा मुलगा नारायण साई, राधेमाँ आदींचा समावेश आहे. ढोंगी बाबांच्या यादीतील पाच बाबा तर सध्या विविध आरोपांखाली तुरुंगाची हवा खात आहेत. 

अाखाडा परिषदेेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी सांगितले की, २०१९ मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यात ढोंगी बाबांच्या प्रवेशावर बंदी केली जाईल. अशा ढोंगी बाबांना लगाम लावण्यासाठी कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली. लोकांनी अशा ठकबाजांबाबत सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत १३ आखाड्यांचे २६ महंत सहभागी झाले.
 
एका प्रक्रियेद्वारे दिली जार्इल संत उपाधी 
- अखिल भारतीय आखाडा परिषदेने म्‍हटले आहे की, कोणालाही संत उपाधी प्रदान करण्‍यासाठी आम्‍ही एक प्रक्रिया तयार करत आहोत.  
- डेरा सच्‍चा सौद्याचा प्रमुख राम रहिम याला 20 वर्षांची शिक्षा झाल्‍यानंतर हिंदु धर्मगुरुंनी हा निर्णय घेतला आहे. 
- विश्‍व हिंदु परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी सांगितले आहे की, देशातील संतांमध्‍ये फार पूर्वीपासून याबाबत विचार सुरु होता. कारण एक किंवा दोन भोंदुबाबांच्‍या दुष्‍कृत्‍यांचा परिणाम सर्व  संतांना भोगावा लागत आहे. 
- आखाडा परिषदेने म्‍हटले आहे, संत उपाधीचा चुकीचा वापर होत आहे. त्‍यामुळे या उपाधीचा गैरवापर टाळण्‍यासाठी एका प्रक्रियाद्वारे ही उपाधी प्रदान केली जाईल.
 
नरेंद्र गिरी यांना मिळाली जीवे मारण्‍याची धमकी 
- आखाडा परिषदेचे अध्‍यक्ष नरेंद्र गिरी यांनी जीवे मारण्‍याची धमकी मिळाली आहे. आखाडा परिषदेच्‍या एक दिवस बैठकीआधी शनिवारी फोनवरुन ही धमकी देण्‍यात आली, असे नरेंद्र गिरी यांनी सांगितले आहे . 
- मागील 3 दिवसांपासून आपल्‍याला धमक्‍या मिळत आहेत. फोन करणा-याने आपण आसारामचा शिष्‍य असल्‍याचे सांगितले, अशी माहिती नरेंद्र गिरी यांनी दिली आहे. 

हे आहेत ढोंगी बाबा-बुवा
आसाराम उर्फ आशुमल शिरमानी, सुखविंदर कौर उर्फ राधे माँ, सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता, गुरमीत राम रहीम, ओम बाबा उर्फ विवेकानंद झा, निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह, इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी, स्वामी असीमानंद उर्फ नब कुमार, ऊं नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, खुशी मुनी, बृहस्पती गिरी व मलकान गिरी.

बृहस्पती गिरी
- कट-कारस्थान रचून उत्तर प्रदेशच्या अलखनाथ ट्रस्टच्या मंदिरांचा अधिकार लाटणे आणि ट्रस्टचे माजी महंत धर्मगिरी यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

सच्चिदानंद गिरी 
- रिअल इस्टेटसह बीअर बार व पब व्यवसायात सहभागी.
- निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वरपद लाटले. 

ओम बाबा
- टाडा आर्म्स खटल्यात पाच वर्षांची कैद भोगली. 
- चोरी, फसवणुकीचे आरोप. नग्न मुलींसोबतचे फोटो व्हायरल.
असीमानंद
- अजमेर, हैदराबाद व समझोता स्फोटांतील आरोपी. 

भीमानंद महाराज
- सेक्स रॅकेट व फसवणूक.
 
पुढील स्लाइडवर वाचा, ढोंगी बाबा व त्यांच्यावरील आरोप....
बातम्या आणखी आहेत...