आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी हिंदूंसाठी भारतीय हिंदूंनी कृतिशील व्हावे; परिसंवादांचा सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामनाथी (गोवा)- भारतीय राज्यकर्ते क्रिकेट, चित्रपट आणि आर्थिक विषयांवर तत्काळ निर्णय घेतात; मात्र हिंदूंच्या समस्यांवर निर्णय घेत नाहीत. परदेशातील अल्पसंख्य हिंदू त्यांच्या अधिकारासाठी भांडतात; मात्र बहुसंख्य असणारे भारतातील हिंदू त्यांच्या अधिकारासाठी भांडत नाहीत. खरे तर विदेशातील हिंदूंसाठी भारतातील हिंदूंनी कृतिशील झाले पाहिजे, असा सूर गोवा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून व्यक्त झाला.

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी विदेशी हिंदूंची स्थिती आणि त्यावरील उपाय या विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली. बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांची माहिती तेथील मायनॉरिटी वॉचचे रवींद्र घोष यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून दिली. हिंदू मुलींचे अपहरण करून धर्मांतर व बळपूर्वक विवाह केले जातात. फाळणीच्या वेळी बांगलादेशात 28 % असणार्‍या हिंदूंची लोकसंख्या आता 8.5% झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने याची दखल घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

श्रीलंकेतील तामिळ हे हिंदूच तामिळनाडूमधील हिंदू मक्कल कत्छी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन संपथ यांनी र्शीलंकेतील तामिळी हिंदूंची समस्या मांडताना सांगितले, र्शीलंकेतील तामिळ हे प्रथम हिंदू आहेत. भारत- पाक युद्धाच्या वेळी र्शीलंकेने पाकच्या विमानांना पेट्रोल भरण्यास सहकार्य केले होते. त्याला तामिळी हिंदूंनी धावपट्टीवर जाऊन रोखले होते. कारण भारत ही त्यांची मातृभूमी आहे. भारतीय हिंदूंनी आता र्शीलंकेतील तामिळी हिंदूंना साहाय्य केले पाहिजे, असे आवाहनही संपथ यांनी यावेळी केले.

धर्मनिष्ठांना निवडून आणा : कुमारानंद
पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांची निर्मिती भारतीय राज्यकर्त्यांमुळेच झाली. हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये साम्यवादी राज्यकर्ते निवडून दिल्याने तेथील स्थिती बिकट झाली. त्यासाठी आता हिंदूंनी जागे होऊन धर्मनिष्ठ राज्यकर्त्यांना निवडून आणावे, असे आवाहन मलेशिया आणि र्शीलंका येथील धर्मगुरू स्वामी कुमारानंद यांनी केले.