आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काका-पुतण्यात मनोमिलन नाही; शिवपाल मंत्रिमंडळात परतणार की नाही याचा निर्णय CM घेतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- समाजवादी पार्टीच्या मॅरेथॉन बैठकांनंतरही काका-पुतण्यात मनोमिलनाचे संकेत नाहीत. दिवसभराच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरापर्यंत समेटाचा फॉर्म्युला समोर आला नाही. असे असले तरी, पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी पक्षात सर्वकाही ठीक असल्याचा दावा केला. कुटुंब पक्षात एकोपा असल्याचाही पुनरुच्चार केला. मंगळवारच्या पत्रकार परिषदेत शिवपाल आणि सरकारमधील बडतर्फ मंत्री मुलायमसिंह यांच्यासोबत दिसले. मात्र, अखिलेश यांच्या गैरहजेरीमुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटले. शिवपालसह अन्य चाैघांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल का, याचा निर्णय मुलायम यांनी अखिलेश यांच्यावर सोपवला.

यासोबत २०१७ च्या निवडणुकीत अखिलेश मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसतील,असे संकेत दिले. निवडणुकीनंतर विधिमंडळ दलाचे आमदार मुख्यमंत्र्यांची निवड करतील,असे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान मुलायम यांनी अमरसिंह यांचे जोरदार समर्थन केले. अखिलेश गटाचे आराेप फेटाळत त्यांनी अमरसिंह यांना प्रत्येक प्रकरणात ओढणे चुकीचे असल्याचे सांगितले. पक्षातून बडतर्फ चुलत भाऊ रामगोपाल यादव यांच्याशी संबंधित प्रश्नावर मुलायम यांनी आपण त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नसल्याचे सांगितले. सोमवारच्या बाचाबाचीच्या बैठकीनंतर मुलायम, अखिलेश आणि शिवपाल यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत.

अखिलेश यांच्या बद्दल काय म्हणाले अमरसिंह..
- समाजवादी पक्षातील वादाला सर्वस्वी अमरसिंह जबाबदार असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. त्यावर अमरसिंहांनी बंगाली वृत्तपत्र आनंद बाजारला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'मी अखिलेश यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्या वाढदिवशी फोन देखील केला होता.'
- दलाल म्हटले गेल्यावर हसत उत्तर देताना अमरसिंह म्हणाले, 'अखिलेश यांना जे पाहिजे होते ते त्यांनी विचारायला पाहिजे होते. मी त्यांना सर्वकाही सांगितले असते.'
- सोमवारी झालेल्या महाबैठकीच्या शेवटीही अखिलेश म्हणाले होते, की त्यांच्याविरोधात अमरसिंह बातम्या छापून आणत आहेत.
- अखिलेश यांच्या आरोपांवर अमरसिंह म्हणाले, समाजवादीचे सुप्रीमो मुलायम यांच्या वक्तव्यानंतर या बोलण्याला काही अर्थ उरत नाही.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...