आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akhilesh Congratulates UP Samajawadi Chief Shivpal Yadav, Appeals Supporters To Withdraw Protest

अखिलेश तर काकांवर जळतो, माझा मुलगा नसता तर जनतेने स्वीकारलेही नसते : मुलायमसिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अखिलेश त्याच्या काकांवर जळतो. तो माझा मुलगा नसता तर त्याला जनतेने स्वीकारलेही नसते, असे समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील काका-पुतण्याचा वाद संपुष्टात आला असला तरी शनिवारी अखिलेश समर्थकांनी केलेल्या आंदोलनामुळे भडकलेल्या मुलायम यांनी अशा शब्दांत फटकारले.
अखिलेश यांनाच प्रदेशाध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी करून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याचा मुलायम यांनी चांगलाच समाचार घेत शिवपालच प्रदेशाध्यक्ष राहतील, असे स्पष्ट केले. तत्पूर्वी शिवपाल यादव यांच्या निवासस्थानी शिवपाल व अखिलेश यांची बैठक झाली. सर्व खाती परत मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर माझा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे, असे अखिलेश यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. मुलायमसिंह यांनी शुक्रवारी काका व पुतण्याची भेट घेऊन त्यांच्यात समेट घडवून आणला होता. त्यानंतर रात्री अखिलेश यांनी सर्व पदे सन्मानपूर्वक दिली जातील, असे जाहीर केले होते. राजकारण माझ्यासाठी खेळ नव्हे. मी त्यास अत्यंत गांभीर्याने घेतो. माझ्या सर्व समर्थकांना आंदोलन करू नका, असे अखिलेश यांनी आवाहन केले आहे. तुमचा वेळ अशा गोष्टींत वाया घालवू नका. लोकांपर्यंत सरकारच्या कामकाजाची माहिती पोहोचवा. ही वेळ निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
रथयात्रा पुढे ढकलली
अखिलेश यादव यांनी समाजवादी विकास रथयात्रेचे ३ ऑक्टोबर रोजी आयोजन केले होते. परंतु आता ही यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु कानपूरमध्ये ४ ऑक्टोबरला मेट्रो प्रकल्पाचा कोनशिला समारंभ होणार आहे. त्यामुळे योग्य वेळी यात्रेला सुरुवात केली जाईल. १४ सप्टेंबर रोजी अखिलेश यांनी ‘समाजवादी विकास रथयात्रा-विकास से विजय की आेर’ अशी यात्रा काढण्यात येईल, असे ट्विटरवरून जाहीर करून टाकले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, समर्थक रस्त्यावर... समाजवादी नंबर वन
बातम्या आणखी आहेत...