(फाइल फोटो: मायावती यांच्यासोबत एका जाहीर सभेत अखिलेश दास)
लखनौ- राज्यसभेचे खासदार अखिलेश दास यांनी आज (बुधवार) बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावतींवर पलटवार केला आहे. मायावती पैशाविना उमेदवारी देत नसल्याचा आरोप खासदार दास यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या बदल्यात मायवती एक कोटी रुपये घेतात, असाही गौप्यस्फोट खासदार दास यांनी केला आहे.
खासदार दास यांनी तीन नोव्हेंबरला बसपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गेल्या दीड महिन्यांपूर्वी मायावती यांनी पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांकडून दहा लाख रुपये मागितल्याचेही दास यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मायावती यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत खासदार अखिलेश दास यांच्यावर आरोप केला होता. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी दास यांनी
आपल्याला 100 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. परंतु आपण रुपये घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचे मायावतींनी सांगितले.
अखिलेश दास यांचा राज्यसभेचा कार्यकाळ येत्या 25 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. अखिलेश दास यांची उत्तर प्रदेशात अनेक शैक्षणिक संस्था आहेत.
यापूर्वी मायावती यांनी राज्यसभेसाठी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले. आझमगडचे राजा राम आणि मुरादाबादचे अॅड. वीर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार दलित वर्गातील आहेत. राजा राम हे चार तर वीर सिंह हे तीन राज्यांचे प्रभारी आहेत. दोघांनी पक्षाच्या विकासासाठी खूप परिश्रम घेतले आहे. कामाची पावती म्हणून दोघांना आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आल्याचे मायावतींनी सांगितले.
मायावती म्हणाल्या, बसपची रणनीती 'सर्वजन हिताय और सर्वजन सुखाय'वर आधारित आहे. अन्य वर्गातील उमेदवार राज्यसभेत जातील तर दलित उमेदवारांमध्ये असंतोष पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाने दलित उमेदवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बसपने आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर उत्तर प्रदेशात चार वेळा सत्ता स्थापन केली होती. पक्षाने सर्व समाजाच्या उमेदवारांना प्रतिनिधित्त्व दिले होते. मात्र, 2012 मधील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी कुटनीतीचा वापर करून बसपला सत्तेवरून बाजूला केले. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत पक्षाने सर्व समुदायातील उमेदवारांनी संधी देण्यात पक्ष असमर्थ राहिल्याचे कबूल केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहेत डॉ.अखिलेश दास....