आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेश निवडणुकीतही महाआघाडीचा प्रयोग शक्य, अखिलेश यांचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत कबीरनगर - बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग भलताच हिट ठरल्याने भाजपविरोधी पक्ष उत्साहित आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशातही महाआघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. राज्यात २०१७ मध्ये निवडणुका होणार आहेत.
अर्थात, अखिलेश यादव यांनी आघाडी अथवा त्यातील घटक पक्षांबाबत फारसे भाष्य केले नाही. अखिलेश यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री फरीद महफूज किडवई यांनी शनिवारी समाजवादी पार्टी व बसपने एकत्र येत आघाडी करून निवडणुका लढवण्याचा सल्ला दिला होता. किडवई म्हणाले होते की, ईश्वराची इच्छा असेल तर उत्तर प्रदेशातही महाआघाडी होऊ शकते आणि आम्ही भाजपला पराभूत करू शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी समाजवादी पार्टी महाआघाडीतून बाहेर पडली होती. उत्तर प्रदेशात भाजपने लोकसभा निवडणुकीत ७१ जागा जिंकून शानदार प्रदर्शन केले होते. २०१७ च्या निवडणुका जिंकून १५ वर्षांनंतर राज्यात
सत्तावापसी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणत आहेत दिग्गज..
बातम्या आणखी आहेत...