आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akhilesh Yadav And Mulayam Singh Yadav Party Meetng After UP Election Result 2017

मुलायमसिंहांच्या पाया पडले अखिलेश यादव, काहीही न बोलता निघून गेले नेताजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर 12 मार्च रोजी अखिलेश यादव यांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. - Divya Marathi
समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर 12 मार्च रोजी अखिलेश यादव यांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली.
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी पक्षाच्या झालेल्या दारुन स्थितीनंतर अखिलेश यादव यांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव देखील होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. अखिलेश वडिलांच्या पाया पडले, त्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत ते घरी निघून गेले. 
 
अखिलेश यांना पाहिल्यानंतर निघून गेले मुलायमसिंह 
- समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर 12 मार्च रोजी अखिलेश यादव यांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली.
- अखिलेश पक्ष प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांच्यासोबत बोलत असताना मुलायमसिंह तेथे पोहोचले. 
- मुलायमसिंहांना माहित नव्हते की अखिलेशही येथे आलेले असतील. 
- मुलायमसिंहांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे उपस्थित कार्यकर्त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. 
- सूत्रांच्या माहितीनुसार, नेताजी आत येतात. अखिलेश आधीपासून तेथे बसलेले असतात. वडील आल्यानंतर अखिलेश त्यांचे चरणस्पर्ष करतात. त्यानंतर मुलायमसिंहांनी पाच मिनिटात तेथून काढता पाय घेतला.
 
अखिलेश यादवांनी मागवला बूथ डाटा
- मुलायमसिंह गेल्यानंतरही अखिलेश बराचवेळ कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत होते. 
- त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले, की अखिलेश म्हणाले, आज होळी साजरी करा. पक्षात काय आणि कसे बदल करायचे ते नंतर पाहू. 
- अखिलेश यांनी प्रत्येक बुथचा डाटा मागवला आहे. 
- उत्तर प्रदेशा विधानसभेत समाजवादी आणि काँग्रेस आघाडीला 54 जागा मिळाल्या आहे. 
- भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना 325 जागांवर विजय मिळाला. त्यात 312 भाजप उमेदवार आहेत. 
- उत्तर प्रदेशात 37 वर्षानंतर प्रथमच एखाद्या पक्षाला 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...