आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसपची भाजपशी जवळीक अजूनही मुस्लिमांच्या लक्षात, अखिलेश यांचा मायावतींना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - समाजवादी पक्षाला मत देऊन मते वाया घालवू नका. कारण त्याचा फायदा भाजपला होईल, असे मुस्लिमांना आवाहन करणाऱ्या बसप सर्वेसर्वा मायावती यांच्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टीका केली आहे. ‘बसपची भाजपशी जवळीक अजूनही मुस्लिमांना आठवते,’ असा टोला त्यांना मायावती यांना मारला.
अखिलेश म्हणाले की, समाजवाद्यांमध्ये फूट पडलेली आहे, असे मायावती म्हणतात. समाजवादी पक्षाला मते देऊ नका, असा सल्ला त्यांनी मुस्लिमांना दिला आहे. पण कोणी रक्षाबंधन साजरे केले होते आणि कोण भाजपच्या प्रचारासाठी गुजरातला गेले होते हे मुस्लिम अजूनही विसरलेले नाहीत.
मायावती यांनी यापूर्वीही भाजपशी युती केली होती. राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले नाही तर भाजपचा पाठिंबा घेणार नाही असे आश्वासन तुम्ही द्याल का, असा प्रश्न त्यांनी मायावतींना विचारला. स्मार्टफोनऐवजी रोख रक्कम देऊ, या मायावतींच्या आश्वासनावर टिप्पणी करताना अखिलेश म्हणाले की, त्या रोख रकमेबद्दल कुप्रसिद्धच आहेत. रोख रक्कम घेण्याची त्यांना सवयच आहे. बसपातून अनेक लोक बाहेर पडले आहेत. मायावतींचे रोख रकमेबाबतच्या प्रेमाचे कारणच त्यांनी दिले आहे. समाजवादी पक्षाने अजूनही आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केलेला नाही, पण विरोधक घाबरलेले आहेत. बसपाच्या राजवटीतील डॉक्टर आणि अभियंत्यांच्या खुनाची प्रकरणे तसेच स्मारकांवरील पैशांची उधळपट्टी लोक अजूनही विसरलेले नाहीत.
राहुल यांच्या वक्तव्याला पाठिंबा
सर्जिकल स्ट्राइकबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त ‘दलाली’ वक्तव्याला अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिला. खूप विचार केल्यानंतरच राहुल गांधींनी ते वक्तव्य केले असावे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दसरा उत्सवासाठी राज्यात येणार असल्याबद्दलही त्यांनी टीका केली. बिहारमध्ये निवडणूक असती तर त्यांनी तेथे रावणदहन केले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...