आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळात परतलेल्या प्रजापतींचे मुख्यमंत्री अखिलेश यांना त्रिवार वंदन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रजापती यांनी शपथग्रहणनंतर अखिलेश यांचे चरणस्पर्श केले. - Divya Marathi
प्रजापती यांनी शपथग्रहणनंतर अखिलेश यांचे चरणस्पर्श केले.
लखनऊ - उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या मंत्रिमंडळाचा अंतर्गत कलहानंतर सोमवारी विस्तार झाला. चार वर्षांतील हा आठवा विस्तार आहे. दोन आठवड्यांपूर्वी बडतर्फ केलेल्या गायत्री प्रजापती यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर प्रजापतींनी तीन वेळा अखिलेश यादव यांना नमस्कार केला तसेच मुलायमसिंह यादव यांच्या पायावर लोटांगण घातले. अखिलेश यांनी विधानसभा निवडणकीपूर्वी आपली प्रतिमा उजळवण्यासाठी भ्रष्ट मंत्री प्रजापती यांना बडतर्फे केले होते. त्यामुळे पक्षात संकट निर्माण झाले होते. मुलायम सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर प्रजापती पुन्हा मंत्रिमंंडळात आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, प्रजापती यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्तीचे प्रकरण
बातम्या आणखी आहेत...