आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलायम सिंहांच्या बर्थडेला शिवपालची अनुपस्थिती, अखिलेशला बळजबरी भरवला केक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिलेश केक खायला तयार नव्हते पण त्यांना बळजबरी केक भरवला. - Divya Marathi
अखिलेश केक खायला तयार नव्हते पण त्यांना बळजबरी केक भरवला.

लखनऊ - 22 नोव्हेंबरला मुलायम सिंह यादव यांचा 79वा वाढदिवस आहे. त्यासाठी समाजवादी पार्टीच्या ऑफिसमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे. शिवपाल आणि रामगोपाल यादव दोघेही या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. पार्टीचे नॅशनल प्रेसिडेंट अखिलेश यादव यांची मात्र यावेळी उपस्थिती होती. यावेळी ते केक खायला तयार नव्हते, पण मुलायम पार्टीतील किरणमय नंदा यांना म्हणाले की, त्याला पकडा अखिलेशला केके भरवण्यात आला. बता शिवपाल यादव आणि अखिलेश यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. 


अखिलेशला समजावत होते मुलायम 
- मुलायम यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. पक्षातील अनेक मोठे नेते कार्यक्रमात उपस्थित होते. पण शिवपाल यादव यांची उपस्थिती नव्हती. रामगोपाल यादव यांचीही वाट पाहण्यात आली पण तेही आले नाही. 
- कार्यक्रमादरम्यान मुलायम अखिलेशला स्टेजवरच काहीतरी म्हणत असल्याचे पाहायला मिळाले. वादासारखी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा किरणमय नंदा मध्यस्थीला आले. 


केक खायला दिला नकार 
- अखिलेश आणि मुलायम यांच्यात काहीसा वाद पाहायला मिळाला. अखिलेश यांनी तर केक खायलाही नकार दिला. नंतर मुलायम यांनी किरणमय नंदांना बोलावले आणि अखिलेशला पकडायला सांगितले. त्यानंतर त्यांना केक भरवला. 
- नंतर मुलायम म्हणाला, आम्ही अखिलेशला आशिर्वाद देत राहू. आधी तो आमचा मुलगा आहे आणि नंतर नेता आहे. 


वाढदिवशी राजकीय वक्तव्य 
- मुलायम यावेळी माध्यमांशीही बोलले. भाजप खोटं बोलून सत्तेत आली असल्याचे ते म्हणाले. 15 लाख देण्याचे आश्वासन दिले होती. एकत्र देता येत नसतील तर हळू हळू द्या. 5 वर्षांत 3-3 लाख द्या. आम्ही सांगितले होते की, आमची सत्ता आली तर शिक्षण, औषधी मोफत देऊ. आम्ही तसे केलेही. 
- संपूर्ण देशात एकाही राज्यात कन्या विद्या धन आणि लग्नाचा पैसा सरकारने दिलेला नाही. आमच्या सरकारने सत्तेत येताच अखिलेशने आश्वासन पूर्ण केले. आता सर्व तेच करत आहेत. आम्ही दिलेली सर्व आश्वासने अखिलेशने पूर्ण केली आहेत. 
- भाषा, हिंदु मुस्लीम असा भेदभाव करता कामा नये. महिला पुरुषांमध्येही भेदभाव करता कामा नये. 65 टक्के लोकांना पोटभर जेवायला मिळते. 35 टक्के लोकांना तर दोन वेळचे जेवणही मिळत नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...