आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यांची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड, मुलायम पुन्हा गैरहजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - समाजावादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन गुरुवारी आग्रा येथे होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिलेश यांनी मुलायमसिंहांना अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले होते,  ते अधिवेशनाला येणार असे सांगितले जात होते. मात्र ते पोहोचले नाही. पुढील पाच वर्षांसाठी अखिलेश यांची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. अधिवेशनाला देशभरातील जवळपास 15 हजार कार्यकर्ते आले. 
 
10 महिन्यानंतर पुन्हा एकदा अखिलेश
- जानेवारी 2017 मध्ये अखिलेश यांच्याकडे पक्षाची सूत्रे देण्याची घोषणा सपा महासचिव रामगोपाल यादव यांनी केली होती. या राष्ट्रीय अधिवेशनात मुलायमसिंहांना मार्गदर्शक करण्यात आले होते. त्यानंतर 10 महिन्यांनी पुन्हा एकदा अखिलेश यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. 
- जानेवारीमध्ये यादव कुटुंबात भांडणाचे कारण असलेल्या अमर सिंहांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते, त्याचवेळी शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. 
- समाजवादी पक्षाची स्थापना 4 नोव्हेंबर 1992 ला मुलायमसिंहांनी केली होती. तेव्हापासून ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता त्यांचा मुलगा अखिलेश पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला आहे.
 
अखिलेश - डिंपल बुधवारपासून आग्र्यात 
- पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाआधी बुधवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. अखिलेश आणि त्यांची पत्नी डिंपल यादव या बुधवारी आग्र्यात दाखल झाल्या. रामगोपाल यादव मात्र 3 ऑक्टोबरपासून आग्र्यात डेरेदाखल होते. 
- अखिलेश यांनी वडील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यांना 28 सप्टेंबरला अधिवेशनासाठीचे निमंत्रण दिले होते. मात्र ते अधिवेशनाला आले नाही. 
- अशीही माहिती आहे, की मुलायमसिंहांनी एका उद्योजक मित्राला अधिवेशनाला जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन मागितले होते. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अखिलेश म्हणाले, 'मी नेताजींना आशीर्वाद मागितला आहे. माझी इच्छा आहे की त्यांनी अधिवेशनाला उपस्थित राहावे.' 
 
शिवपाल यांनी सर्वच ऑफर नाकारल्या
बुधवारी शिवपालसिंह यादव यांनी मुलायमसिंहाची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार मुलायसिंहांनी शिवपाल यांना आग्र्याला चलण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिला. अशीही माहिती आहे की नाराज शिवपाल यांनी लोहिया ट्रस्टचाही राजीनामा देण्याची तयारी केली आहे. 
- मुलायमसिंह यांनी शिवपाल यांना महासचिव पद देण्याची तयारी दर्शवली होती, आणि ते स्वतः दिल्लीत पक्षाचे काम पाहातील असे सांगितले, मात्र शिवपाल यांनी मुलायम सिंहाच्या सर्व ऑफर नाकारल्या. 
- विधानसभा निवडणुकीपासून शिवपाल आणि अखिलेश यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. ते अद्याप शांत झालेले नाही. 
बातम्या आणखी आहेत...