आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhilesh Yadav Launch Bhaskar Uttar Pradesh Online Edition

‘भास्कर’ची उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाइन आवृत्ती लाँच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - देशातील सर्वात मोठा माध्यम समूह ‘दैनिक भास्कर’ने उत्तर प्रदेश ऑनलाइन आवृत्ती dainikbhaskar.com/up लाँच केली आहे. लखनऊमध्ये शनिवारी झालेल्या एका शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते या आवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले.

देशातील सर्वांत मोठय़ा हिंदी भाषिक राज्याच्या बातम्या व त्यांचे अचूक विश्लेषण जगभरातील युर्जसना तत्काळ उपलब्ध व्हावे म्हणून लखनऊमध्ये एक स्वतंत्र संपादकीय टीम उभारण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण उत्तर प्रदेशात बातमीदारांची टीमही स्थापण्यात आली आहे. या टीम प्रत्येक शहरातील बातम्यांचे रिअल टाइम कव्हरेज वाचकांपर्यंत पोहोचवतील. बातम्यांच्या अचूक विश्लेषणासाठी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकांचे एक पॅनलही स्थापण्यात आले आहे. संपूर्ण राज्याच्या बातम्या युर्जसपर्यंत पोहोचवण्यासाठी भास्कर समूहाने इतक्या मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन टीम तयार केल्या आहेत.

लोकार्पण सोहळ्यात अखिलेश यादव म्हणाले की, दैनिक भास्करच्या ऑनलाइन आवृत्तीमुळे अवघ्या यूपीतील घडामोडी आता कळतील. भास्कर समूहाच्या या पुढाकाराला शुभेच्छा देत ‘तुम्ही नंबर वन आहात आणि नेहमीच तो कायम ठेवा’, अशा सदिच्छाही दिल्या.
या वेबसाइटवर लखनऊ, कानपूर, आग्रा, वाराणसी, अलाहाबाद, मेरठ आणि झाशीसह यूपीतील सर्व लहानमोठय़ा शहरांतील क्षणोक्षणीच्या बातम्या असतील. वाचकांच्या दृष्टीकोनातून मोठय़ा बातम्या विश्लेषणासह दिल्या जातील. इतकेच नव्हे तर अधिकाधिक छायाचित्रांच्या माध्यमातून त्या संपूर्ण माहिती व रंजकपणे सादर केल्या जातील. राज्यातील प्रमुख जागांवरील निवडणुकीचे ग्राऊंड रिपोर्टिंग केले जाईल. स्थानिक प्रश्नांवर अभियान चालवून त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले जातील.

दैनिक भास्कर समूहाच्या 14 राज्यांत चार भाषांत 67 आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. चार प्रमुख भाषांमध्ये समूहाची वेबसाइट असून त्याला सुमारे 30 कोटी हिट्स मिळतात. हिंदी आणि गुजरातीतील dainikbhaskar.com आणि divyabhaskar.co.in या त्या-त्या भाषेतील जगात सर्वाधिक वेगाने लोकप्रिय होणार्‍या वेबसाइट्स आहेत.

लोकार्पण सोहळ्यात यूपीचे कारागृहमंत्री व सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी, माहिती विभागाचे प्रमुख सचिव नवनीत सहगल, दैनिक भास्कर समूहाचे गिरीश अग्रवाल, दैनिक भास्कर डिजिटलचे सीओओ ज्ञान गुप्ता, कार्यकारी संपादक अनुज खरे, यूपीचे संपादक र्शवण शुक्ला आणि संपादकीय टीम उपस्थित होती.
उत्तर प्रदेशातील अपडेट्साठी लॉग इन करा.. dainikbhaskar.com/up

(फोटो : वेबसाइटचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री अखिलेश यादव. सोबत दैनिक भास्कर समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल.)