आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत यादवी: पिता-पुत्रातील तणावामुळे समाजवादी पक्षात फूट पडण्याचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- समाजवादी पक्षात दीड महिन्यापासून सुरू असलेल्या घडामोडींचे रूपांतर आता पिता-पुत्राच्या लढाईत होत आहे. त्यामुळे समाजवादी पक्षात फूट पडण्याची अटकळ बांधली जात आहे. मुख्यमंत्री अखिलेश यांनी रविवारी काका आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांना बडतर्फ केले. यामुळे नाराज झालेल्या मुलायमसिंह यादव यांनी काही तासांतरच अखिलेश यांचे समर्थक असलेले आपले चुलतभाऊ रामगोपाल यांची पक्षातून हकालपट्टी केली.
त्याआधी अखिलेश यांनी आपल्या घरी मंत्री, आमदार आणि विधान परिषद सदस्यांची बैठक शक्तिप्रदर्शनासाठी बोलावली. शिवपाल समर्थक मंत्र्यांना बोलावण्यात आले नाही. बैठकीला ३०० पेक्षा जास्त उपस्थिती होती. अखिलेश यांनी अमरसिंह यांना ‘खलनायक’ ठरवून त्यांच्या समर्थकांना हटवण्यात येत असल्याची घोषणा केली.

आमदारांच्या बैठकीत अखिलेश भावुक झाले. ते म्हणाले की, मी वडिलांची नेहमी सेवा करीन. पक्ष फोडणार नाही, पण कट रचणाऱ्यांवर करावाई होईल. नेताजींना वाढदिवशी एक्स्प्रेस-वे भेट देईन. भावुक अखिलेश म्हणाले कीस लहानपणी कोणीतरी नेताजींच्या राजकारणाच्या विरोधात बोलले होते तेव्हा मी वीट फेकून मारली होती. शिवपाल यांच्यासह अमरसिंह यांचे जवळचे मंत्री नारद राय, ओमप्रकाश सिंह आणि शादाब फातिमा यांना बडतर्फ करण्यात आले. त्याचबरोबर अभिनेत्री जयाप्रदा यांच्याकडील चित्रपट विकास परिषदेचे उपाध्यक्षपदही काढण्यात आले. रामगोपाल यांची हकालपट्टी झाल्यानंतर पक्षाच्या कोअर ग्रूपची बैठक झाली. दुसरीकडे मुलायमसिंह यांनी सोमवारी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
रामगोपाल यांनी लिहिले पत्र
आमदारांच्या नावे लिहिलेल्या पत्रात पक्षातील दोन गटांचा उल्लेख आहे. त्यांनी लिहिले,‘अखिलेश यांच्या नेतृत्वात यूपीत समाजवादी सरकार कायम राहावे अशी आमची इच्छा आहे. पण अखिलेश यांचा पराभव व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्या लोकांनी हजारो कोटी रुपये कमावले आहेत, व्याभिचार केला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग केला आहे.’
मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर शिवपाल सिंह, नारद राय, आर. शादाब फातिमा, आेमप्रकाश सिंह यांनी पत्र परिषद घेतली.
बातम्या आणखी आहेत...