आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: कधी असे लाजत तर कधी दिसले अॅक्शनमध्ये, लहानपणी असे दिसत होते CM अखिलेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा आज (1 जुलै) वाढदिवस आहे. मुख्यमंत्री अखिलेश आज 43 वर्षांचे झाले आहेत. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते कुटुंबासह 29 जून रोजी लंडनला गेले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त divyamarathi.com दाखवत आहे मुख्यमंत्री अखिलेश यांचे बालपणापासून आतापर्यंत ते कसे बदलत गेले.

अखिलेश यांचा जन्म 1 जुलै 1973 रोजी इटावा येथे झाला.
- सुरुवातीला ते इटावामध्ये शाळेत होते, नंतर राजस्थानच्या धौलपूर येथील सैनिकी शाळेत त्यांचे शिक्षण झाले.
- म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्यूएशन केले होते.
- ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण केले.
- 24 नोव्हेंबर 1999 रोजी डिंपलसोबत त्यांचे लग्न झाले.
- त्यांना अदिती, टीना आणि अर्जून ही तीन मुले आहेत.
- 2000 मध्ये कन्नौज लोकसभा पोट निवडणुकीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. वडील मुलायमसिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यांनी येथून निवडणूक लढवली होती.
- अखिलेश यादव 2000-2004, 2004-2009, 2009-2012 असे तीनवेळा खासदार झाले.
- 2012 मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अखिलेश यादव यांचे Rare फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...