आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलायम यांची जागा घेण्याचा अखिलेश यांचा प्रयत्न, पक्षाच्या पोस्टरवरून पिता गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलायम यांचे स्थान मिळविणे कठिण (फाईल) - Divya Marathi
मुलायम यांचे स्थान मिळविणे कठिण (फाईल)
लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारपासूनच समाजवादी पक्षाचे मेंबरशिप कॅम्पेन सुरू केले. या मोहिमेत पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव पूर्णपणे गायब आहेत. प्रत्यक्ष हजेरी तर, दूरच... पक्षाच्या पोस्टरवरून मुलायम सिंह यांचा फोटो सुद्धा लावण्यात आलेला नाही. याच पोस्टरवर मात्र लोहिया आणि जनेश्वर यांची छायाचित्रे पाहायला मिळाली. भास्कर समूहाशी बोलताना राजकीय विश्लेषकांनी अखिलेश आता राष्ट्रीय स्तरावर मुलायम यांची जागा घेण्यासाठी सरसावले आहेत असे मत मांडले. 
 
अखिलेश यांची पत्रकार परिषद
- अखिलेश यादव यांनी मेंबरशिप कॅम्पेन सुरू केल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांच्या मागे समाजवादी पक्षाचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरवर जनेश्वर मिश्र आणि राम मनोहर लोहिया यांना सर्वात वर ठेवण्यात आले. मात्र, मुलायम सिंह यांना जागा देण्यात आली नाही. 
 
राष्ट्रीय स्तरावर स्वत:ला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न
- राजकीय विश्लेषक रतन मणी लाल यांच्या मते, "अखिलेश यादव यांनी आता पूर्णपणे पक्षावर नियंत्रण मिळविले आहे. ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या निर्णयांवर माघार घेण्यास तयार नाहीत. आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आता आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोत असा संदेश अखिलेश यांनी यापूर्वीच दिला." मणी लाल पुढे म्हणाले. अखिलेश यादव आता हीच गोष्ट राष्ट्रीय स्तरावर सुद्धा सिद्ध करण्यासाठी मुलायम सिंह यांच्या जागी स्वत:ला प्रोजेक्ट करत आहेत. 
 
तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाची महत्वाकांक्षा
- रतन मणि लाल ने यांनी सांगितल्याप्रमाणे, "ज्या पद्धतीने अखिलेश यादव तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत, त्याच प्रकारे त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी सुद्धा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत अखिलेश या दिशेने पुढे जात आहेत. यावेळी तर, ते स्वत:ला तिसऱ्या आघाडीचे नेते म्हणून सादर करत आहेत. यामुळेच, त्यांनी आपल्या पक्षाच्या बॅनरवरून पिता मुलायम यांचे छायाचित्र गायब केले."
 
मुलायम यांचे स्थान मिळविणे कठिण
- ज्येष्ठ पत्रकार हेमंत तिवारी यांच्या मते, "अखिलेश आपले वडील मुलायम यांना पक्षातून पूर्णपणे वेगळे केले आहे. त्यांनी केवळ नावापुरते संरक्षक म्हणून ठेवण्यात आले आहे. अखिलेश यांची कारकीर्द मुलायम यांच्याप्रमाणे असली, तरीही त्यांना मुलायम यांचे स्थान मिळविणे कठिण जाणार आहे. कारण, शरद पवार, ममतचा बॅनर्जी, नितीश कुमार, अन्नाद्रमुक आणि त्यातही मायावती अखिलेश यांना तिसऱ्या आघाडीचे नेते होऊ देणार नाहीत. एवढेच नव्हे, तर अखिलेश मायावतींशी सुद्धा हातमिळवणी करू पाहत आहेत. ही गोष्ट समाजवादी पक्षासाठी घातक ठरू शकते. असा इशारा सुद्धा राजकीय तज्ञ देत आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...