आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपाल यांच्या मुलाच्या लग्नात अखिलेश-डिंपल यांनी असे केले होते एन्जॉय, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड गितांच्या तालावर ठेका धरताना शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश. - Divya Marathi
बॉलिवूड गितांच्या तालावर ठेका धरताना शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश.
लखनऊ - समाजावादी पक्षातील वाद-विवादाचा सिलसिला काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यांच्यात बेबनाव असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्यातील संबंध किती टोकाला गेले आहेत, हे २४ ऑक्टोबर रोजी समाजवादी पक्षाच्या मुख्यालयातील सभेत संपूर्ण देशाने पाहिले. या काका-पुतण्यामधून आज विस्तव जात नसला तरी सात महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. शिवपाल यांचे चिरंजीव आदित्य यादवच्या लग्नात अखिलेश आणि त्यांच्या खासदार पत्नी डिंपल यांनी जोरदार डान्स केला होता. या लग्नातील डिंपल आणि अखिलेश यांचा उत्साह शिवपाल यांच्यापेक्षा अधिक असल्याचे जाणवत होते. काका-पुतण्यानेही एकत्र ठेका धरल्याचे तेव्हा अनेकांनी पाहिले होते.
समाजवादी पक्षातील सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर divyamarathi.com आज आदित्य आणि राजलक्ष्मी यांच्या लग्नातील काही खास फोटो घेऊन आले आहे. ज्यामधून तुम्हाला लक्षात येईल की अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील नाते कसे होते.

केव्हा झाले होते लग्न
- १० मार्च २०१६ ला सैफई येथे आदित्य-राजलक्षमी यांचे लग्न झाले.
- राजलक्ष्मीची आई शारदा कुंवरसिंह राजपूताना मेहर स्टेटच्या राजकुमारी होत्या.
- राजलक्ष्मीचे आजोबा राजा कुंवर नारायणसिंह जूदेव हे ३ वेळा आमदार होते.
- हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे राजलक्ष्मीचे आजोबा आहेत.
- राजलक्ष्मीचे वडील संजयसिंह हे एकेकाळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय समजले जात होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेंदीपासून लग्न समारंभापर्यंत दीराच्या लग्नात डिंपल यांची उपस्थिती
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...