आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यांचे मौन, शिवपाल यांनी घोषित केले 30 उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ : समाजवादी पक्षात अजूनही सर्व आलबेल नाही. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी तीन दिवसांत ३० उमेदवार बदलले आहेत. सोमवारी त्यांनी सात उमेदवारांची घोषणा केली. त्यातील दोन ठिकाणचे उमेदवार शनिवारी निश्चित झाले होते, ते दोन्ही बदलण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अखिलेश समर्थकांना अजूनही तिकीट मिळालेले नाही.

सोमवारी बदललेल्या उमेदवारांत अमेठीतील तिलोई विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तेथून मयंकेश्वरणसिंह यांना हटवून जैनुल हसन यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याआधी शनिवारीही शिवपाल यांनी २३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्या
त कौमी एकता दलाच्या विलीनीकरणानंतर सपात आलेले मुख्तार अन्सारी यांचा भाऊ सिबगतुल्ला अन्सारी याच्यासह अलाहाबादमधील गुंड अतिक अहमदला कानपूर छावणी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. अमपारू आणि खागा या दोन जागांवरील शनिवारी जाहीर झालेले उमेदवारही बदलण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...