आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar May Be BJP Candidate From Gurdaspur Seat After Death Of Vinod Khanna

अक्षय कुमारला भाजपकडून खासदारकीचे तिकीट? विनोद खन्ना यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
चंदीगड - गुरदासपूर-पठाणकोट लोकसभा जागेवरून भाजपतर्फे अक्षय कुमार यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. खन्ना यांच्या दुसऱ्या पत्नी कविता यांचे नाव देखील चर्चेत आहे. 27 एप्रिल रोजी विनोद खन्ना यांचे निधन झाले.
 
अक्षय कुमार यांना नुकताच रुस्तम या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच शहीद जवानांच्या मदतीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची सुद्धा चर्चा झाली. भाजपशी वाढत्या जवळिकतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष त्यांना खासदारकीचे तिकीट देणार अशी चर्चा आहे. 
 
भाजपचे नेते विजय वर्मा म्हणाले...
विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गुरदासपूर-पठाणकोट लोकसभा जागेवरूनन कविता योग्य उमेदवार आहेत. तरीही, पक्षातर्फे ज्यांना तिकीट दिले जाईल, आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. 
 
मोदींच्या लाटेत सर्वांना विजयाची अपेक्षा
- गुरदासपूर-पठाणकोट जागेवर उमेदवारी मिळवण्यासाठी स्थानिक नेते सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास विरोध होणार ही शक्यता नकारता येणार नाही. उद्योजक स्वर्णसिंह सलारिया, माजी आमदार अश्विनी शर्मा, जगदीश साहानी आणि अविनाश राय खन्ना यांचेही नाव घेतले जात आहे.
- यूपी आणि दिल्लीत झालेल्या भाजपच्या विजयावरून या ठिकाणी सुद्धा मोदींच्या लाटेत आपणही निवडून येऊ अशी सर्वच इच्छुक उमेदवारांची अपेक्षा आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा... विनोद खन्ना यांचा भाजप प्रवास...
बातम्या आणखी आहेत...