आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Head Of Al Qaeda’S Subcontinent Unit Could Be Former UP Resident

भारतीय उपखंडातील अल कायदाच्या शाखेचा प्रमुख युपीचा असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : भारतीय उपखंडातील अल कायदाचा प्रमुख मौलाना आसिम उमर याने आपली ओळख अद्याप जगजाहीर केलेली नाही.

नवी दिल्‍ली - भारतीय उपखंडात अल कायदा या दहशतवादी संघटनेची शाखा सुरू झाल्याच्या बातम्यांनंतर या संघटनेचा प्रमुख मौलाना आसीम उमर पाकिस्‍तानी वंशाचा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण या प्रकरणी भारतीय गुप्तचर संस्थांना एक नवी माहिती हाती आली आहे. आसीम मूळचा उत्‍तर प्रदेशातील असल्याची माहिती मिळाल्याने गुप्तचर संस्था सतर्क झाल्या आहेत. देवबंद येथील दारुल उलूममधून तालीम मिळाल्यानंतर 1990 मध्ये तो भारताबाहेर गेला होता, अशी माहितीही मिळाली आहे.
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेश पोलिस आणि इंटलिजेंस ब्युरो (IB) ने भारतात 1990 च्या दशकात सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेकांची याबाबत चौकशी केली आहे. त्यावेळी एखादा भारतीय नागरिक परदेशात गेला होता का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुप्तचर संस्था करत आहेत. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पण प्राथमिक माहितीनुसार मौलाना आसीम उमर भारतीय असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
90 च्या दशकात गेला पाकिस्तानात
वृत्तपत्राने पाकिस्तानी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार मौलाना उमर 90 च्या दशकात पाकिस्‍तानात गेला होता. त्यानंतर त्याने कराचीमधील धार्मिक शिक्षण देणा-या जामिया उलूम-ए- इस्‍लामिया या संस्थेमध्ये शिक्षण सुरू केले. या संस्थेतून मौलाना मसूद अजहर आणि इतरही अनेक दहशतवादी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. भारतासह सुमारे 60 देशांच्या विद्यार्थ्यांनी या संस्थेचे प्रशिक्षण घेतले असल्याचा दावा संस्थेच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे. मौलाना आसिम उमर याला दहशतवादाचे बाळकडू निजामुद्दीन शमजई नावाच्या धर्मगुरूने पाजले होते. त्याला तालिबानचा नीकटवर्तीय मानले जात होते.
शंका वाढली
पाकिस्तानचे बहुतांश पत्रकार @Pak_witness नावाचे ट्वीटर हँडल वापरतात. पाकिस्तानातील इस्लामिक आंदोलनांशी संबंधित माहिती मिळवण्याचा हा प्रभावी स्त्रोत मानला जातो. उमरला अल कायदाच्या नव्या प्रमुख पदाची जबाबदारी दिल्याची घोषणा केल्यानंतर या अकाऊंटवरून त्याच्याबाबत माहिती देण्यात आली होती. तेव्हाच तो भारतात दारुल अलूम देवबंद आणि कराचीच्या मदरशांमध्ये शिकल्याचे समोर आले होते.
दारुल उलूमचे म्हणणे काय?
दारुल उलूमचे प्रवक्ते मौलाना अशरफ उस्‍मानी म्हणाले की, फोटो नसल्यामुळे आणि त्या व्यक्तीची येथे असण्याची अंदाजे तारीखही माहिती नसल्याने तो येथील विद्यार्थी होती किंवा नाही याबाबत दुजोरा देणे किंवा नकार देणे अवघड आहे. उस्‍मानी यांच्या मते, येथे हजारो विद्यार्थी येतात. त्याशिवाय जे अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात, त्यांच्याबाबत पूर्ण माहितीही उपलब्ध नसते.