फोटो : अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी
नवी दिल्ली - भारताता शाखा सुरू केल्यानंतर दहशतवादी संघटना अल-कायदा त्यांची हिटलीस्टही तयार केली आहे. या लिस्टमध्ये भारतातील अणु प्रकल्प आण्विक संस्था, अनेक महत्त्वाची विमानतळे आणि अनेक शहरातील महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. त्याशिवाय पंतप्रधान
नरेंद्र मोदीसह विविध पक्षांचे नेते आणि इतर अनेक बड्या हस्तीही हशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.
गुप्चचरसंस्थांनी अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर धोका असलेली स्थळे आणि व्यक्तींची माहिती मिळवली. एका इंग्रजी वृत्तपत्राने गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बेंगळुरू विमानतळ आणि शहरातील आयटी कंपन्या, कानपूरमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि कर्नाटकमधील कॅगा न्यूक्लियर प्लान्ट तसेच तुंगभद्र पॉवर प्लान्टवर दहसतवाद्यांची खास नजर आहे.
सुरक्षा संस्थांनी तयार केली नोट
सुरक्षा संस्थांनी अल-कायदाचा धोका लक्षात गेता एक नोट तयार केली आहे. त्यात म्हटले आहे की, जवाहिरीने व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे काश्मीर, गुजरात आणि आसामचा उल्लेख केला आहे, त्यावरून त्यांच्या कटाचा अंदाज येतो. नोटमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, अल-कायदा लवकरच काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करू शकते. हा धोका लक्षात घेता सर्व राज्यांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच या सर्व ठिकाणांवर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
राज्यातील या ठिकाणांना धोका
- मुंबई स्टॉक एक्सचेंज, (शेअर बाजार)
- चित्रपटसृष्टी
- आरएसएस कार्यालय
- नरीमन पॉइंट
- महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, मुंबई
- गेट वे ऑफ इंडिया
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असणारे नेते
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
लालकृष्ण अडवाणी, भाजपचे ज्येष्ठ नेते
उमा भारती, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या.
प्रवीण तोगडि़या, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस
बाबू बजरंगी, बजरंग दलाचे नेते
शिवसेना नेते, कोणत्याही खास नेत्यांचे नाव सांगण्यात आलेले नाही.
सुशील कुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते
नरेंद्र अमीन, गुजरात क्राइम ब्रँचचे माजी एसीपी
केपीएस गिल, पंजाबचे माजी डीजीपी
कल्बे सादिक, शिया स्कॉलर
अरशद मदानी, जमात उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष
पुढे वाचा - इतर राज्यांमधील धोका असणारी ठिकाणे