अलाहाबाद - जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, हेमवतिनंदन बहुगुणा, विश्वनाथ प्रतापसिंह,
अमिताभ बच्चन, जनेश्वर मिश्र आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना संसदेत पाठवणार्या या लोकसभा मतदारसंघात या वेळी लढाई आहे ती केशरी, नंदी आणि श्यामा यांच्यात. एक महिन्यापर्यंत समाजवादी पार्टीचा ध्वज उंचावणारे बिडी व्यापारी श्यामाचरण गुप्ता भाजपचे उमेदवार आहेत. मायावतींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नंद गोपाल गुप्ता नंदी अगोदर तर भाजपचे तिकीट मागत होते. ते नाही मिळाले म्हणून काँग्रेसचे तिकीट घेऊन आले. नंदी यांना राजकारणात आणणार्या केशरीदेवी पटेल बसपच्या उमेदवार आहेत आणि दोन वेळा लागोपाठ खासदार राहिलेल्या रेवती रमणसिंह सपाच्या उमेदवार आहेत.
आम आदमी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार्या लालबहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री हेच एकमेव असे उमेदवार आहेत की, ज्यांना अलाहाबादच्या बाहेरील लोकसुद्धा ओळखतात; परंतू अॅपल व
सॅमसंगचे भारतातील विक्री प्रमुख राहिलेले शास्त्री लढाई क्षेत्रातून बाहेर आल्यासारखेच दिसत आहेत. मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी भाजप नेत्यांत चुरस आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष केशरीनाथ त्रिपाठी यांचे नाव भाजपात अंतिम झालेले होते. बातमीसुद्धा येऊन गेली होती, परंतु जेव्हा भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी उमेदवारांची नावे घोषित केली, तेव्हा त्या यादीतून अलाहाबाद गायब झालेले होते, असे सांगण्यात आले की, दोन-तीन दिवसांनी घोषणा होईल. परत घोषणा करण्यात आली की, श्यामा चरण सपा सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत अलाहाबादमधूनच ते भाजपचे उमेदवार असतील.
केशरीनाथ राजकारणाला कंटाळून आता वकिली व्यवसायाकडे वळले आहेत. ‘भास्कर’शी संवाद साधताना ते म्हणाले, मी कधीही तिकिटाची आशा केलेली नव्हती, परंतु पक्षाचा आदेश आल्याने लढण्यास तयार झालो होतो. नंतर दुसर्यालाच तिकीट देण्यात आल्याचे कळाले.
भाजपचे लोक सांगतात, काही वर्षांपूर्वी नंदी लॉटरीची तिकिटे विकायचे. प्लास्टिक कप, प्लेट हॉटेलांना पुरवत असत. नंतर काही वर्षांतच ते अरबपती बनले. बसपचे आमदार आणि मंत्री बनले. पत्नीला महापौर बनवले आणि आता नितीन गडकरी व अमित शहा यांची शिफारस आणली. त्याच वेळी डॉ. मुरली मनोहर जोशींनी श्यामाचरणांची री ओढून केशरीनाथ यांचे तिकीट कापले. डॉ. जोशी आणि केशरीनाथ यांच्यातील रस्सीखेच 30 वर्षांपासूनची आहे. दोघेही प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना विरोध करतात. हेच कारण आहे की, डॉ. जोशी येथूनच लोकसभा निवडणूक हरले अन् केशरीनाथ विधानसभा. अलाहाबाद शहरातील पाच विधानसभा क्षेत्रांपैकी चार खेडीच आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळेच समीकरण. उत्तर प्रदेशमध्ये बहुधा येथेच जातीयवादी राजकारण रंगते. मोदी लाटेवर स्वार दलबदलू विडी व्यापारी श्यामाचरण यांना वरिष्ठ बसप नेत्या केशरीदेवींशी लढताना नाकीनऊ आलेले आहेत.